व्यापार्‍याचे अपहरण करुन लुटणारे अटक ः पाथर्डी पोलिसांची कारवाई

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी ः शहरात परप्रांतीय व्यापार्‍यांचे अपहरण करून त्यांना मारहाण करत लूटमार करणार्‍या चार सराईत गुन्हेगारांना पाथर्डी पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांत अटक केली आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अंकुश नवनाथ मडके, शुभम अंबादास कराड, केतन दिगंबर जाधव, सुहास काशिनाथ ढाकणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. केतन जाधव हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खून, अपहरण, दरोड्यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
16 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता उत्तर प्रदेशातील अजयसिंग रणसिंग नायक, सुनीलकुमार छत्तरसिंग नायक व यादसिंह बालकिशन नायक हे तिघे त्यांच्या चारचाकी वाहनातून शहरातील अहिल्यानगर रस्त्यावरील शंकर नगर येथे वस्तू विक्रीसाठी आले होते. यावेळी नऊ आरोपींनी त्यांचे वाहनासह अपहरण केले.
आरोपींनी व्यापार्‍यांना मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम, दोन मोबाईल फोन, गॅस शेगडी, होम थिएटर, कुलर आदी वस्तूंसह एकूण 49 हजार रुपयांचा माल लुटला. तसेच साक्षीदारांना धमकावून त्यांच्याकडून साडेसात हजार रुपये गुगल पे द्वारे हस्तांतरित करून घेतले. यानंतर, आरोपींनी व्यापार्‍यांना वाहनात बसवून अहिल्यानगर रोडवर नेत असताना त्यांचे वाहन भरधाव चालवताना समोरून येणार्‍या चारचाकीला जोरदार धडक दिली. यात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. गुन्हा दाखल होताच पाथर्डी पोलिसांनी चार स्वतंत्र पथके स्थापन करून तपास सुरू केला. पोलिसांनी प्रथम अंकुश मडके याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून इतर आरोपींची नावे उघड केली. त्यानंतर शुभम कराड, केतन जाधव, सुहास ढाकणे यांना अटक करण्यात आली. या तीनही आरोपींना पाथर्डी न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीश एस. डी. वाघमारे यांनी त्यांना 20 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!