मुंगी शिवारातील खून प्रेमसंबंधातील वादातून ,छ.संभाजीनगरातून दोघे अटक ; अ.नगर क्राईम ब्रॅच टीमची कामगिरी

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर ः शेवगांव तालुक्यातील मुंगी गावाच्या शिवारात आढळून आलेल्या खूनाचा उलघड झाला असून, या तपासाला अहिल्यानगर क्राईम बॅ्रच तपासी टीमला चार दिवसानंतर यश आले आहे. ही खूनाची घटना प्रेमसंबंधातील वादातून झाली असून, त्या प्रेताची विल्हेवाट लावणार्‍या त्या दोघा प्रेमीयुगुला तपासाअंती हार्सुल (छ.संभाजीनगर) येथे पकडण्यात आले आहे.
दुर्गेश मदन तिवारी (रा.वडोद,कान्होबा, ता.खुलताबाद,जि.छ.संभाजीनगर), भारती रविंद्र दुबे (रा.फ्लॅट नं. 201, एस.एस. मोबाईल शॉपीजवळ, कॅनोट प्लेस सिडको, जि.छ.संभाजीनगर) असे अटक आरोपींची नावे आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि. 12 ऑगस्ट 2025 रोजी मुंगी (ता.शेवगांव) गावाच्या शिवारात गोदावरी नदीपात्रालगत शेताच्या बाजूला एक पुरुष जातीचे अंदाजे 30 वयाचा अनोळखी प्रेत मिळून आले होते. याबाबत शेवगांव पोलीस ठाण्यात रजि.नंबर 95/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 194 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोेंद करण्यात आली होती. हा अकस्मात मृत्यू संशयास्पद असल्याने अहिल्यानगर एसपी सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर क्राईम ब्रॅँचचे पोनि किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली या अकस्मात मृत्यूच्या चौकशीकामी विशेष टीम तयार केली. या तपासी टीममध्ये पोउपनि राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, बाळासाहेब गुंजाळ, बाळासाहेब खेडकर, रमिझराजा आतार, प्रशांत राठोड, भगवान धुळे व सारिका दरेकर आदी पोलिस कर्मचारी घेण्यात आली.
तपासी टीमने घटना ठिकाणी भेट देऊन मृतदेहाची बारकाईने पाहणी केली. मयत याच्या गळ्यास धारदार हत्याराने कापलेले दिसून आले. तपासी टीमने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करुन तसेच घटना ठिकाणचे आजुबाजूचे शेतमालक यांच्याकडे चौकशी केली. परंतु काहीही उपयुक्त माहिती मिळाली नाही. मयताचे प्रेत हे गोदावरी नदीच्या पात्रामध्ये मिळून आले असल्याने व गोदावरी नदी ही पैठण परिसरातून वाहत येत असल्याने तपासी टीमने पैठण व छ.संभाजीनगर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात दाखल मिसिंगची माहिती घेतली. मयताच्या वर्णनाशी मिळतीजुळती हकीगत असलेल्या इसमाची हार्सुल पोलीस ठाणे (जि.छ.संभाजीनगर) येथे मनुष्य बेपत्ता र.नं.62/2025 प्रमाणे बेपत्ता दाखल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बेपत्तामधील नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली. त्यांनी मयतास ओळखून मयताचे नांव सचिन पुंडलिक औताडे (वय 32, रा. कोलठाणवाडीरोड, शिवनेरी कॉलनी, हार्सुल, छ.संभाजीनगर) असे असल्याचे सांगितले.
तपासकामी नेमण्यात आलेले तपासी टीमने आरोपींची माहिती काढत असतांना आरोपी हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्या ठिकाणी जाऊन दुर्गेश मदन तिवारी (रा.वडोद,कान्होबा,ता.खुलताबाद,जि.छ. संभाजीनगर), श्रीमती भारती रविंद्र दुबे (रा.फ्लॅट नं. 201, एस.एस. मोबाईल शॉपीजवळ, कॅनोट प्लेस सिडको, जि.छ.संभाजीनगर) यांच्याकडे चौकशी केली. त्यांना अधिक चौकशीकामी अहिल्यानगर क्राईम ब्रॅँच येथे दि.18ऑगस्ट2025 रोजी बोलावून घेऊन त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली. त्या चौकशीत त्यांनी मयत सचिन पुंडलिक औताडे यास दि.़31जुलै2025ला रात्रीच्या वेळी बोलावून घेऊन त्यास प्रेमसंबंधातील वादाच्या कारणातून त्यांचा साथीदार अफरोज खान (पूर्ण नांव माहीत नाही रा. खटखट गेट, ता.जि.छ.संभाजीनगर) यास बोलावून घेऊन मयताचा चाकूने गळा कापून खून केला. अफरोज खान याच्याकडील कारमध्ये त्याचे प्रेत टाकून प्रेताची व गुन्ह्यामध्ये वापरलेला चाकू, कपडे याची विल्हेवाट लावली असल्याची कबुली त्यांनी यावेळी दिली.
मयताचा भाऊ राहुल पुंडलिंक औताडे याने दिलेल्या तक्रारीवरुन शेवगांव पोलीस ठाण्यात गुरनं. 720/2025 भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 103(1),3(5) प्रमाणे दि.17 ऑगस्ट 2025 रोजी आरोपींविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अहिल्यानगर क्राईम ब्रॅच तपासी टीमने सलग 4 दिवस तपास करुन मयताची ओळख पटवून आरोपींना ताब्यात घेतलेले आहे. ताब्यातील आरोपींना शेवगांव पोलीस ठाण्यात खूनाच्या गुन्ह्याच्या तपासकामी शेवगांव पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. गुन्ह्याचा पुढील तपास शेवगांव पोलीस करीत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!