पल्लवी बोठे याना मास्टर्स ऑफ सायन्स इन मार्केटिंग इंटेलिजन्स विषयांमध्ये पदवी प्रदान
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर ः अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ सॅन फ्रान्सिसको कॅलिफोर्निया या विद्यापीठातून मास्टर्स ऑफ सायन्स इन मार्केटिंग इंटेलिजन्स या विषयांमध्ये एम. एस. यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. विद्यापीठाने त्यांना नुकतीच एम. एस. पदवी प्रदान केली आहे. श्रीमती पल्लवी बोठे ह्या वाळकी ता. नगर येथील सेवानिवृत्त अप्पर जिल्हाधिकारी नानासाहेब बोठे यांची सून असून निघोज ता. पारनेर येथील व्यावसायिक संजय कवाद यांच्या कन्या आहेत त्यांचे माध्यमिक शिक्षण सेंट जोसेफ हायस्कूल मुंबई येथे झाले असून वेलिंकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई या प्रतिष्ठित संस्थेतून त्यांनी पदवी मिळवलेली होती. त्यांचे पती अनिकेत बोठे यांचे शिक्षण देखील एम. एस. असून ते अमेरिकेतील वॉलमार्ट या कंपनीत सीनियर मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती पल्लवी बोठे यांनी शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल पल्लवी बोठे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.



