कु.गायश्री सांगळे हिला एम.एस इंडस्ट्रियल इंजीनियरिंग विषयामध्ये पदवी प्रदान.
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर ः बफेलो युनिव्हर्सिटी न्यूयॉर्क या अमेरिकेतील विद्यापीठातून कु. गायश्री सांगळे हिने इंडस्ट्रियल इंजीनियरिंग या विषयांमध्ये एम. एस. यशस्वीरित्या पूर्ण केले असून विद्यापीठाने त्यांना नुकतीच एम. एस. पदवी प्रदान केली आहे. कुमारी गायश्री सांगळे ही शिबलापूर ता. संगमनेर येथील व्यावसायिक बाळासाहेब सांगळे यांची कन्या असून आश्वि ता. संगमनेर परिसरातील जुन्या पिढीतील डॉ. कै. भागवत सांगळे यांची नात आहे. तिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण आश्वी येथील शाळेत झाले असून ग्रामीण भागातून शिक्षण घेऊनही तिने परदेशातून एम. एस. पर्यंतच्या शिक्षणाचा खडतर प्रवास केलेला आहे. त्यामुळे तिच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.



