दुचाकीस्वारास लुटणा-यास भिंगार कॅम्प पोलीसांनी केले जेरबंद

दुचाकीस्वारास लुटणा-यास भिंगार कॅम्प पोलीसांनी केले जेरबंद
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : दुचाकीस्वारास लुटणा-यास भिंगार कॅम्प पोलीसांनी जेरबंद केले. किरण सुरेश चावरे (वय २१, श्रीराम कॉलनी, भिंगार अहमदनगर ), एक विधीसंघर्षीत बालक अशी पकडण्यात आलेले आहेत.
एसपी राकेश ओला, अहमदनगर अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सपोनि योगेश राजगुरु यांच्या सूचनेनुसार पोसई अमोल बोरसे , पोलीस अंमलदार संदिप घोडके, दिपक शिंदे, समीर शेख. अमोल आव्हाड, संदिप थोरात, कैलास शिरसाठ, कांतीलाल चव्हाण, दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडू यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.२२ डिसेंबर २०२३ रोजी फिर्यादी रामेश्व सुधाकर ढवळे (रा वडगांव बुद्रुक जि पुणे) यांनी भिंगार कॅम्प् पोलीस ठाण्यात हजर होऊ फिर्याद दिली की, रात्री १ वाजण्याचे सुमारास ते त्यांचे दुचाकीवरुन विजयलाईन चौकाच्या मार्गे पाथर्डीच्या दिशेने जात असतांना डी ओ मोपेड गाडीवरील तीन अज्ञात इसमांनी बळजबरीने फिर्यादीच्या सँगमधील २० हजार रु किंमतीचा मोबाईल फोन हा बळजबरीने घेऊन गेले आहेत, या फिर्यादीवरुन कॅम्प पोलीस ठाण्यात गुरनंबर ८०७/२०२३ भादंवि कलम ३९२,३४ प्रमाणे गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आलेला होता. गुन्हा केल्यापासून आरोपी फरार होते.
दि. १६ फेब्रुवारी २०२४ रोजी भिंगार पोलीस ठाण्याचे सपोनि योगेश राजगुरु यांना गोपनिय माहीती मिळाली की, दाखल गुन्ह्यातील फरार दोन सशंयित हे विजयलाईन चौकात येणार आहेत. सपोनि श्री राजगुरु यांनी तात्काळ भिंगार पोलिसांची टिम त्या ठिकाणी जाऊन खात्री करुन संशयित इसमांना ताब्यात घेण्याबाबतच्या तोंडी आदेश दिल्याने तपास पथकातील अंमलदारांनी त्या ठिकाणी जाऊन सापळा लावून दोन इसमांना खात्री करुन ताब्यात घेवुन त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची किरण सुरेश चावरे (श्रीराम कॉलनी, भिंगार अहमदनगर), एक विधीसंघर्षीत बालक असे असल्याचे सांगीतल्याने त्यांना विश्वासात घेऊन गुन्हयांचे अनुषंगाने चौकशी करता त्यांनी प्रथम उडवाउडविची उत्तरे दिली तसेच त्यांना अधिक विश्वासात घेवुन पुन्हा चौकशी करता दोघांनीही गुन्हा हा त्यांचे आणखी एका साथीदारांच्या मदतीने केला असल्याचे कबुल केले. आरोपी किरण चावरे याच्याकडून गुन्ह्यातील चोरुन नेलेला २० हजार किंचा मोबाईल फोन हा जप्त करण्यात आला. गुन्ह्याचा अधिक तपास पोसई अमोल बोरसे हे करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!