कोल्हारघाटात मंगळसूत्र धुमस्टाईलने चोरणारे चोरटे पकडले ; नगर एमआयडीसी पोलीसांची कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : कोल्हार घाटामध्ये महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र धुमस्टाईलने चोरणारे सराईत चोरटे पकडण्यात नगर एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. या चोरट्यांकडून ५० हजार रु किंमतीचे दोन तोळे वजनाचे सोन्याचे मिनीगंठन पोलिसांनी जप्त केले आहे. अक्षय उर्फ दिपक यशंवत आव्हाड (रा. सोनगाव पाथरा, ता.राहाता जि.अहमदनगर), फिरोज उर्फ लखन अजिज शेख (रा. मुकीमंदपुर ता.नेवासा जि.अहमदनगर, अमरचिलु कांबळे (रा. मुकीमदपुर ता. नेवासा जि.अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सपोनि माणिक चौधरी यांच्या सूचनेनुसार पोसई योगेश चाहेर, पोहेकाॅ नंदकुमार सांगळे, पोहेकाॅ राजु सुद्रीक, पोना विष्णु भागवत, पोना महेश बोरुडे, पोकाॅ किशोर जाधव, पोशि नवनाथ दहिफळे, पोकाॅ जयसिंग शिंदे, पोकाॅ सुरज देशमुख, पोकाॅ भगवान वंजारी तसेच मोबाईल सेल अहमदनगरचे पोकाॅ राहुल गुंड्डु, पोकाॅ नितीन शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि. २१ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १ ते १.३० वाजण्याच्या दरम्यान जेऊर बायजाबाई ते कोल्हार जाणारे रोडवर कोल्हार घाटात (ता.जि.अहमदनगर) येथे गाडीवर जात असतांना अज्ञात तिघांनी पती यांना आमच्या गाडीला कट का मारला? असे म्हणून आमची गाडी थांबविली. यावेळी तिघांपैकी पाठीमागे बसलेल्या एकाने गळ्यातील लॉग गंठण व मिनी गंठण हे बळजबरीने हिसकावून घेऊन कोल्हार रोडच्या दिशेने पळून गेले, या सौ. संगिता सांरगधर वांदेकर ( रा विद्याकॉलनी कल्याणरोड ता.जि अहमदनगर) यांनी फिर्याद दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुरनं ६१/२०२४ भादवि कलम ३९२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास करत असतांना सपोनि माणिक चौधरी यांना माहिती मिळाली. त्यानुसार सराईत आरोपी अक्षय उर्फ दिपक यशंवत आव्हाड, फिरोज उर्फ लखन अजिज शेख, अमरचिलु कांबळे यांना नगर एमआयडीसी पोलीसांच्या टिमने आरोपींना मोठ्या शिताफीने पकडून अटक करण्यात आली. त्याना पोलिस टाक्या दाखविताच त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यातील ५० हजार रु किमतीचे सोन्याचे पिवळ्या धातुचे २ तोळे वजनाचे मिनीगंठण जप्त केले आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलिस करीत आहेत.


