एटीएम कार्ड क्लोन करुन लाखोंची फसवणूक ; फरार आरोपी अटक : अहमदनगर सायबर पोलिसांची महत्त्वपूर्ण कामगिरी

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन  नेटवर्क
अहमदनगर-
एटीएम कार्ड क्लोन करुन लाखोंची रक्कम एटीएम मशिनव्दारे काढून फसवणूक करणा-या टोळीचा मुख्य आरोपी सायबर पोस्टे कडून मिरारोड (जि. ठाणे) येथून पकडण्यात यश आले आहे. सुजित राजेंद्र सिंग (रा. वसई जि. पालघर ) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीची नाव आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणे पो. नि.  नंदकुमार दुधाळ यांचे नेतृत्वाखाली पोसई प्रतिक कोळी, पोहेकॉ योगेश गोसावी, पोहेकॉ उमेश खेडकर, पोना दिंगबर कारखेले, मलिक्कार्जुन बनकर, राहुल हुसळे, विशाल अमृते, पोकॉ. अरूण सांगळे, गणेश पाटील चापोहेकॉ वासुदेव शेलार यांच्या सायबर पोलीस ठाणे पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत दि. ११ मे २०२१ यातील फिर्यादी व साक्षीदार यांचे एटीएम कार्ड क्लोन करुन त्यांचे दुसरे एटीएम बनवून ते वेगवेगळया एंटीएममध्ये वापरुन त्यामधुन फिर्यादी व साक्षीदार यांचे पैसे काढून १ लाख ४४ हजार  रु फसवणूक केली आहे,    या संबंधिताच्या  फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात  गुरंन १७३/२०२१ भा.द.वि ४२०,४०६,४६५, ४६८, ४७१,४७४, ३४ सह माहीती तंत्रज्ञान अधि २००० चे कलम ६६ (C) (D) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. अहमदनगर सायबर पोलिस ठाण्याच्या पथकाने सदर गुन्हयाचे तांत्रिक विश्लेषण करून गुन्हयाचे अनुषंगाने एटीएममधील सीसीटिव्ही  फुटेज ताब्यात घेऊन त्याव्दारे आरोपींचा नगर कल्याण रोडने पाठलाग करुन आरोपी धिरज अनिल मिश्रा, सुरज अनिल मिश्रा (रा नायगाव मुंबई) यांना टोकावडे (ता ठाणे) येथून ताब्यात घेण्यात आले होते.  आरोपीकडून ३१ बनावट एटीएमकार्ड, २ लाख ६१ हजार ५०० रू. हस्तगत करण्यात आले होते.  आरोपी यांनी त्यांचा मुख्य साथीदार सुजित राजेंद्र सिंग (रा. वसई जि. पालघर) याचे सांगण्यावरून गुन्हा केल्याचे सांगितले, तेव्हापासून सुजित राजेंद्र (सिंग रा. वसई जि. पालघर) हा फरार होता. दि. ११ सप्टेंबर २०२१ रोजी पो. नि. नंदकुमार दुधाळ यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली. पाहिजे असलेला आरोपी सुजित राजेंद्र सिंग हा मिरारोड वसई येथे येणार असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली. सायबर पोलिस पथकातील अधिकारी यांनी त्या  ठिकाणी जावून सापळा लावून आरोपी यास ताब्यात घेतले.  त्याने त्याचे नाव सुजित राजेंद्र सिंग (वय ४४ हल्ली रा. मितालीहाईटसगोल्डन नेस्ट वसई विरार जि.ठाणे मुळ रा.कचवा जि. मिर्झापुर उत्तर प्रदेश) असे सांगितले. त्याने  गुन्हयाची कबूली देवून त्याचेकडून गुन्हयात वापलेला एक लॅपटॉप, ५ मोबाईल हॅण्डसेट, एक कॉम्प्युटर, ७ पेनड्राईव्ह ४ ATM कार्ड क्लोन करण्याकरीता लागणारे स्किमर मशिन, एक कलर प्रिंटर, ५४ बनावट एटीएम कार्ड, ४६ कोरे बनावट कार्ड, एटीएम  कार्ड तयार करण्यासाठी लागणारे, ६ विविध कंपन्याचे सिम कार्ड असा ४७ हजार ४०० रू. कि. चा मुद्देमाल मिळून आला आहे.  आरोपी याचेवर यापूर्वी अहमदबाद, सुरत गुजरात, मुंबई येथे अशाच स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी यास गुन्हयात अटक करुन न्यायालयात हजर केले.  त्यांना  न्यायालयाने ४ दिवसाची पोलीस कोठडी  सुनावली आहे. पुढील तपास सायबर पोलीस ठाण्याचे पो नि. नंदकुमार दुधाळ हे करीत आहेत.

👉सर्व नागरीकांना सायबर पोलिसांच्या वतीने आवाहन करण्यात येते की, कोणत्याही अनोळखी ठिकाणी एटीएमचा वापर करू नये. अनोळखी व्यक्तीच्या हातात आपले एटीएम कार्ड देवू नये. आपल्या एटीएम  कार्डचा पिन नंबर कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करु नये. एटीएम रूममध्ये कोणत्याही व्यक्तीला आपल्या मागे उभे राहण्यास मज्जाव करावा.
  अहमदनगर सायबर पोलिस ठाणे




Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!