नाशिक आयजी टिम : ६० लाख ८० हजार रु.चा गुटखा पकडला

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
‍ Online Natwork
जळगाव :
जिल्ह्यातील पहुर पोलीस ठाणे हद्दीत तब्बल ६० लाख ८० हजार रु.चा गुटखा घेऊन जात‌ असलेल्या अशोक लेलंड कंटेनर पकडण्याची मोठी कारवाई करण्याची कामगिरी नाशिक आयजी टिम’ने केली आहे.
नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी.शेखर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विशेष टिम’चे पोनि बापू रोहोम व अंमलदार एएसाय रविंद्र शिलावट, बशीर तडवी, पोना प्रमोद मंडलीक, पोना. मनोज दुसाने, चापोशि नारायण लोहरे आदिंची कारवाई केली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी.शेखर पाटील यांनी नेमणूक केलेल्या टिम’ ला दि.२० मार्च २०२३ रोजी पहाटे ५.०५ वाजण्याच्या सुमारास पहुर पोलीस ठाणे हद्दीत सोनाळा फाटाजवळ रोडवर अशोक लेलंड कंटेनर ( एचआर. ४७ डी ९८५६) या वाहनामध्ये चालक शराफत अली हसन मोहमंद (वय ३० रा. चहलका, ता तावडू जि.नुहु राज्य हरियाणा) याने व वाहन मालक इमान खान शाहबुद्दीन (रा. घर. नं. ११. बाई.नं. ६, घसेरा, पलवल राज्य हरियणा), मॅनेजर गोलू (पूर्ण नाव गाव माहित नाही) व प्रतिबंधिक अन्न पदार्थ गुटखा मालक राजु भाटीया (रा. दिल्ली पुर्ण नाव पत्ता माहित नाही) अशांनी संगनमत करुन महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी असल्याचे माहिती असताना पान मसाला व सुंगधित तंबाख, सुपारी या असुरक्षित, आरोग्यास घातक, अपायकारक व प्रतिबंधीत अन्न पदार्थ असलेला दिलबाग प्लस पान मसाला, ए-प्लस तंबाखू अवैधरित्या स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता दिल्ली या राज्यातून महाराष्ट्र राज्यात विक्रीकरीता खरेदी केला.

तो माल अशोक लेलंड कंटेनर वाहन ( एचआर. ४७ डी ९८५६) या वाहनामध्ये वाहतूक करतांना एकूण ६० लाख ८० हजार रु. किंमतीच्या मुद्देमालासह मिळून आले. तसेच दिल्ली या राज्यातील गुटख्याचा मालक राजु भाटीया (रा. दिल्ली पुर्ण नाव पत्ता माहित नाही) यांनी तसेच उत्पादन कंपनी (५) SOM GLOBAL PAN MASALA PVT LTD B 33%, NARAINA INDUSTRIAL AREA, PHASE – NEW DELHI ११००२८ (६) SOM GLOBAL ZARDA PVT LTD B १०१. NARAINA, INDUSTRIAL AREA, PHASE – NEW DELHI ११००२८ अशांनी राज्य उत्पादन शुल्क दिल्ली व सेंट्रल एक्साईज भारत सरकार यांच्याकडील गुटख्याकरीता असलेले बिल न देता प्रतिबंधीत अन्न पदार्थ विमल पान मसाला गुटखा, वि-१ तंबाखु उत्पादीत करुन हा महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी असतांना देखील स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता संगनमत करुन त्यांना महाराष्ट्र राज्यातील मुंबई या परिसरात विक्री करण्याकरीता मुंबई येथील अनोळखी मालक यांचे माध्यमातून दिला आहे.
याबाबत पहुर पोलीस ठाणे (जि.जळगाव) येथे गुरनं. ८० / २०२३ भारतीय दंड विधान कायदा कलम ३२८,२७२,२७३,१८८,१०९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!