👉तत्कालीन मंत्र्यांनी सामाजिक कार्यकर्ते सानप यांच्या निवेदनाची दखल घेतली होती.
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Network
अहमदनगर- पाथर्डी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तुळशीराम सानप यांनी तत्कालीन सहकारमंत्र्याकडे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान मिळावे, म्हणून निवेदनाद्वारे मागणी केली होती. तत्कालीन मंत्र्यांनी सामाजिक कार्यकर्ते सानप यांच्या निवेदनाची दखल घेतली होती. यानंतर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्प मार्च २०२० मध्ये निर्णय घेतला होता. अनुदान देण्याबाबत महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय घेतला होता. परंतु कोरोना आजाराच्या संकटामुळे अनुदान शेतकऱ्यांना २०२०मध्ये देण्यात आले नव्हते. याच कारणामुळे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान किंवा मदत द्यावी याबाबतचे मागणी निवेदन पाथर्डी तालुक्यातील कुतरवाडी सामाजिक कार्यकर्ते तुळशीराम सानप यांनी दि. २० डिसेंबर २०२१ रोजी समक्ष भेट घेऊन तत्कालीन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन दिले होते. श्री पाटील यांनी सानप यांच्या निवेदनाची विशेष दखल घेऊन सहकार प्रधान सचिव यांना योग्य ती कार्यवाही तातडीने करण्याबाबतचे आदेश दिले होते.

याबाबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तत्कालीन वित्तमंञी तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, तत्कालीन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील तसेच इतर मंत्री महोदयांना याबाबत विशेष बैठक आयोजित करून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान किंवा मदत देण्याचा निर्णय घेतला होता. नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्याला ५०हजार रुपये मदत मिळावी , शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, शेतकऱ्यांना पिक विमा मिळावा, शेतकऱ्यांना अनुदान मिळावे, शेतकऱ्यांच्या जनावरा करीता सरकारने चारा छावण्याचा चालू कराव्यात याबाबत, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक माफ करावी, याकरिता सानप यांनी मंत्रालयाच्या जाळीमध्ये उडी मारली होती. या कारणामुळे पोलिसांनी सानप यांच्यावर कारवाई केली होती. नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्याला ५०हजार रुपये अनुदान दि. १०सप्टेंबर २०२२ पासून शेतकऱ्यांना अनुदान वाटप होणार आहे, असे सानप यांनी सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते सानप यांनी शेतकऱ्यांना अनुदान किंवा मदत मिळणे बाबत प्रयत्न केल्याने त्यांचे शेतकरी वर्गातून आभार मानले जात आहे.


