संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Network
महाराष्ट्र शासनाने माझी कन्या भाग्यश्री योजना १ एप्रिल २०१६ रोजी सुरू केली. मुलींच्या जन्माचे स्वागत करणे, मुलींच्या जन्माचे प्रमाण सुधारण्यासाठी आणि स्त्री-शिक्षणाला चालना देण्यासाठी ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत, राज्यातील ज्या पालकांनी मुलीच्या जन्मानंतर एक वर्षाच्या आत कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली. त्यांच्या मुलीच्या नावावर शासनाकडून ५० हजार रुपये जमा केले जातात. तसेच ज्यांना दोन मुलीच आहेत. त्या पालकांच्या मुलींच्या नावे प्रत्येकी 25 हजार जमा केले जातात. मात्र, दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर पुढील सहा महिन्यात आई किंवा वडिलांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागते.
👉दोन मुलींनाच मिळेल लाभ
माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकाच व्यक्तीच्या दोन मुलींनाच लाभ दिला जातो. माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत, एका मुलीच्या जन्मानंतर १ वर्षाच्या आत पालकांना कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करावी लागते. किंवा दुसरी मुलगी जन्मल्यानंतर ६ महिन्यांच्या आत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेले प्रमाणपत्र सादर करावे लागते. या योजनेअंतर्गत, पूर्वी दारिंद्र्य रेषेखालील कुटुंबे (BPL) ज्यांचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपर्यंत होते. त्या कुटुंबासाठी ही योजना पात्र होती. मात्र, नवीन १ ऑगस्ट २०१७ रोजी योजनेच्या सुधारित प्रपत्रानुसार म्हणजे नवीन नियमानुसार या योजनेंतर्गत मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांवरून ७.५ लाख रुपये करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न ७.५ लाख रुपये आहे. तेही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.


