संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांच्याहस्ते शहरचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे श्री ची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी मंदिर व परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावर्षी गांधी मैदान येथे मनपाने गणपती स्टॊल ला परवानगी नाकारली होती. त्यामुळे हा परिसर शांत होता. माळीवाडा,चितळे रोड येथे गणपती खरेदी साठी गर्दी होती तर घरी गणपती आणल्यानंतर त्याचे औक्षण करताना केले.




