कोतवाली पोलिसांची पोलीसिंग : चोरीस गेलेला मुद्देमाल फिर्यादीस दिला मिळवून

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर-
चोरी दाखल गुन्ह्यातील मुद्देमाल आरोपीला पकडून हस्तगत केला. तो मुद्देमाल कायदेशीर फिर्यादी यांना परत मिळवून देण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी कोतवाली पोलीसांनी केली आहे.


याबाबत समजलेले माहिती अशी की, घरातून कोणीतरी अज्ञात चोरट्यानी सोन्याच्या वस्तू चोरून नेल्या, या पूजा मनोज बडे (रा. भूषणनगर केडगाव अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिस ठाण्यात गु.र.नं. 1394/2022. भा.द.वी.क., 380, 457,454, 34 अन्वये दाखल करण्यात आला होता. कोतवाली पोलिस ठाण्याचे पो नि संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सपोनी रविंद्र पिंगळे, पोना मोहन भेटे, पोना नकुल टोपरे, पोहेकॉ दिपक साबळे यांच्या पथकाने चाणक्षाने तपास करून दाखल गुन्हयातील आरोपींचा कसोशीने शोध घेतला. यात आरोपी अमोल बाबासाहेब जरे (वय 37 रा. रभाजीनगर केडगाव अहमदनगर) याला अटक केली. गुन्हयातील गेलाला मालापैकी मुद्देमाल हस्तगत केला.
यानंतर न्यायालयाच्या आदेश हस्तगत मुद्देमाल फिर्यादी बडे यांना परत करण्यात आला आहे.

जुगार अड्ड्यावर छापा
अहमदनगर, ः सार्वजनिक ठिकाणी तिरट जुगार खेळणाऱ्या अड्ड्यावर कोतवाली पोलिसांनी छापा टाकला. पाच आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून सहा हजार रुपये रोख रक्कमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले.
कोतवालीचे पोनि संपतराव शिंदे यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, रेल्वे स्टेशन रस्त्यावरील लोखंडी पुलाच्या आडोशाला काहीजण जुगार खेळत आहेत. त्यांनी गुन्हे शोध पथकला कारवाईचे आदेश दिले. या पथकाने मंगळवारी (दि.३०) दुपारी ३ वाजता या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळेस पाच जण या ठिकाणी गोल रिंगण करून पत्त्यांवर नावाचा जुगार खेळत त्यांना आढळून आले. या पथकाने त्यांना पकडून त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम असा ६ हजार ३१० रुपयांचा ऐवज हस्तगत केला. पोलिस अंमलदार सुजय विल्यम हिवाळे (वय ३२) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी दीपक बाळू वाघमारे (वय ३६, रा. रामवाडी, सर्जेपुरा), शेखर सतीश भिंगारदिवे (वय ३६, रा. जिल्हा परिषदेसमोर, माळीवाडा), धनेज दिलीप चव्हाण (वय २९, रा. आदर्शनगर, कायनेटिक चौक), चंद्रशेखर सूर्यकांत खुडे (वय ४८, बालाजी वसाहत, शिवाजीनगर, कल्याण रोड), विजय अशोक कांबळे (वय १९, रा. मल्हार चौक, स्टेशन रस्ता) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!