आव्हानांशी समरस व्हा : दत्ता इंगळे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर : जागतिकीकरणात प्रत्येक क्षेत्रात अगदी झपाट्याने बदल होत आहेत. सन २०१० नंतर छायाचित्रण कलेतही अगदी झपाट्याने बदल झाले आहेत. छायाचित्रण कलेत करिअर करीत असताना या बदलत्या आव्हानांचा अभ्यास करून स्वतःला नेहमी अपडेट ठेवत समरस व्हावे, असे मत ‘सकाळ’चे वृत्त छाचित्रकार दत्ता इंगळे यांनी व्यक्त केले.

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त रेणूका माता मल्टीस्टेट या संस्थेने आयोजित केलेल्या छायाचित्रकारांच्या सत्काराप्रसंगी ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातपुते यांच्या हस्ते छायाचित्रकारांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी पत्रकार सातपुते यांनी छायाचित्रकारांना शुभेच्छा देताना सांगितल्या. पत्रकरिता क्षेत्रात पत्रकार आणि वृत्त छायाचित्रकार या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे सांगितले. या वेळ त्यांनी आपल्या पत्रकारितेतील ३८ वर्षांच्या जीवनातील काही आठवणी सांगितल्या.
यावेळी अनिल शहा, समीर मन्यार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राजू खरपूडे, लहू दळवी, विजय मते, श्रीकांत वंगारी, सुरेश मैड, सुरेश भुस्सा, विक्रम बनकर, प्रसाद शिंदे, उपस्थित होते.
मल्टीस्टेटचे व्यवस्थापक दत्ता अंकम यांनी प्रास्ताविक केले.


