👉राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अहमदनगर पथकाची कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर – दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग ब-2, अहमदनगर पथकातर्फे 18 ऑगस्ट 2022 रोजी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार चिलवडी शिवार, राशीन करमाळा रोडवर, कर्जत (ता. कर्जत जि. अहमदनगर) येथे 8 लाख 28 हजार 100 रुपयांचा अवैध मद्याचा मुद्देमाल जप्त केला असून वाहतुक करीत असताना वाहनाचा पाठलाग केला असता जप्त केलेल्या वाहनामध्ये गोवा राज्य निर्मितीचा विदेशी मद्याचा साठा मिळून आला, ही कारवाई अहमदनगर राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली आहे.
या गुन्हयाची अधिकच्या माहितीप्रमाणे प्रथम दर्शनी दिसून येते की, परराज्यातील मद्य, महाराष्ट्रात आणून त्याची अवैध विक्री करण्याचा आरोपीचा हेतू असल्याचे दिसून येते. या गुन्हयात बेकायदेशीरपणे परराज्यातील विदेशी मद्याचा साठा वाहतुक केल्याने, उत्तरेश्वर गोरख बदे, रा. वलटे वस्ती, उमरड, ता. करमाळा जि. सोलापूर या आरोपीस अटक करण्यांत आली आणि एक आरोपी फरार झालेला आहे. या आरोपी विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये अजूनही काही लोकांचा समावेश असण्याची शक्यता असून या गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे. या प्रकरणाचा पुढील तपास श्री. आर. पी. दांगट दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, ब-२. अहमदनगर हे करीत आहेत.


