
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
भिंगार – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने भिंगार या ठिकाणी भिंगार भाजपाच्या वतीने भाजपा नगर शहर जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव दहिहांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी (दि.१५) मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. दरम्यान उपस्थितीत मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले आहे.

यावेळी श्री दहिहांडे बोलताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली व राज्याचे भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची आम्ही भूमिका घेऊन त्या पार पडल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपध्दतीमुळे माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्तेला पक्षात एका पदावर काम करता आले आहे. यापुढील काळातही सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन पक्ष वाढीसाठी जोमाने काम करणार असल्याचे ते म्हणाले.
अनेक मान्यवरांची भाषणे झाली. भाजपाचे गणेश साठे, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


