संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.
त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.
18 मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे आहेत: सर्वश्री राधाकृष्ण विखे-पाटील ( महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास),
सुधीर मुनगंटीवार (वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय), चंद्रकांत पाटील (उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य), डॉ. विजयकुमार गावित ( आदिवासी विकास), गिरीष महाजन (ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण) गुलाबराव पाटील (पाणीपुरवठा व स्वच्छता), दादा भुसे ( बंदरे व खनिकर्म ), संजय राठोड (अन्न व औषध प्रशासन), सुरेश खाडे (कामगार), संदीपान भुमरे ( रोजगार हमी योजना व फलोत्पादन), उदय सामंत (उद्योग), प्रा.तानाजी सावंत (सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण), रवींद्र चव्हाण (सार्वजनिक बांधकाम, (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण),अब्दुल सत्तार (कृषी), दीपक केसरकर (शालेय शिक्षण व मराठी भाषा), अतुल सावे ( सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण), शंभूराज देसाई (राज्य उत्पादन शुल्क), मंगलप्रभात लोढा ( पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास).


