चिंचपूर पांगुळ येथे तिरंगा रॅली उत्साहात

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी – 
देशाचा सर्वञ अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. या निमित्त देशात केंद्र सरकारमार्फत विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील डोंगरात वसलेले चिंचपूर पांगुळ येथे शुक्रवारी (दि.१२) ‘आझादी का अमृत महोत्सव’ अभियानांतर्गत तिरंगा रॅली काढण्यात आली होती. यावेळी रॅलीत उपस्थितींनी वंदे मातरम्, भारतमाता की जय, अश्या घोषणा दिल्या.

चिंचपूर पांगुळ ग्रामपंचायतीच्या वतीने नवीन गावठाण बाजारतळ ते पाथर्डी रोड व पुन्हा त्याच मार्गे ग्रामपंचायत कार्यालय अशी तिरंगाध्वज रॅली काढण्यात आली होती.


रॅलीमध्ये भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा युवानेते  धनंजय बडे पा. यांच्या हस्ते यावेळी  राष्ट्रध्वज वाटप करून रॅलीस सुरुवात केली.
राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही,याकडे प्रत्येक नागरिकांनी कटाक्ष्यान लक्ष द्यावे. तो घरावर कशा पद्धतीने लावावा याचे मार्गदर्शनही यावेळी करण्यात आले.
यावेळी युवानेते डॉ राजेंद्र खेडकर,पोपटराव बडे पा., संजय उदमले, डॉ.गणेश मुळीक, डॉ.अशोक बडे, शहादेव खाडे, जगन्नाथ बडे, दगडू बडे, ग्रामसेवक बी.जी.साळुंके, तुकाराम बडे, विक्रम साखरे, रावसाहेब गीते, अक्षय बारगजे, सोमनाथ बडे, गणपत बडे, सूर्यभान बडे आदिं मान्यवरांसह रॅलीत जिल्हा परिषद शाळा, श्री वामनभाऊ विद्यालय विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आरोग्य उपकेंद्र  कर्मचारी  व ग्रामस्थ सहभागी झाले होते.

✍🏻संकलन-संकलन पत्रकार सोमराज बडे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!