नगरात वंदे मातरम्, भारतमाता की जय, कोतवालीची ‘तिरंगा’ दुचाकी रॅली

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर
शहरातून वंदे मातरम्, जय हिंद, भारतमाता की जय, ही घोषवाक्य व हातात देशाची आणबाण शान असलेला तिरंगा ध्वज हातात घेऊन अहमदनगर शहरातून कोतवाली पोलिस ठाण्याच्या कर्मचा-यांनी वरिष्ठ पोलिस अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (दि.१२) दुचाकी रॅली काढण्यात आली.
नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिस ठाण्याचे पो नि संपत शिंदे यांच्यासह पोलिस कर्मचा-यांनी कोतवाली पोलिस ठाण्यापासून डाॅ बाबासाहेब आंबेडकर पुतळा-छञपती शिवाजी महाराज पुतळा-सक्करचौक- जुनी महापालिका माळीवाडा- चितळीरोड ते कापडबाजारमार्गे पुन्हा कोतवाली पोलिस ठाणे अशी दुचाकी रॅली काढण्यात आली होती. या रॅली मोठ्या उत्साहाने पोलिस कर्मचारी सहभागी झाले होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!