१ राखी सैनिकांसाठी : उपक्रमातून राष्ट्रवादी काँ. मा. सैनिक सेलचा रक्षाबंधन

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पुणे :
१०१ प्रादेशिक सैन्य बटालियन (Teritorial Army), पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस माजी सैनिक सेलच्या रक्षाबंधनचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रुपालीताई चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस माजी सैनिक सेलच्या महिलांनी सर्व सैनिकांना राखी बांधून सैनिकांना ओवाळले व अविरत सुरक्षा देण्याचे काम करत असल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले.


यावेळी 101 प्रादेशिक सैन्य बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल मनीष प्रियदर्शन, राष्ट्रवादी काँग्रेस माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष दिपक शिर्के, राष्ट्रवादी काँग्रेस माजी सैनिक सेलचे प्रदेश सरचिटणीस बाबासाहेब जाधव, पश्चिम महाराष्ट्र संघटक वसंत आजमाने, पुणे शहर अध्यक्ष अविनाश ढोले पा., राष्ट्रवादी काँग्रेस माजी सेल लोहगावचे अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, रावसाहेब हराळ, शेकडो सैनिक व महिलांनी सहभाग घेतला.
यावेळी सैनिकांच्या कार्याची स्तुती करत सैनिकांवर अभिमान असल्याचे सांगितले व खूप सुंदर असा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस माजी सैनिक सेलचे धन्यवाद व्यक्त केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!