पंकजा मुंडे काय म्हणाल्या…

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई – 
राज्यात नुकत्याच झालेल्या  मंत्रिमडळाच्या विस्तारानंतर चर्चा सुरू झाली आहे. यानंर होणा-या मंञ्याच्या नियुत्यात पंकजा मुंडेंना स्थान दिले जाणार का? अशी एकंदरीत राज्यात चर्चा आहे.  पंकजा मुंडेे यांच्याशी गुरुवारी रक्षाबंधनाच्या दिवशी  पत्रकारांशी संवाद साधला असता, त्या म्हणाल्या….


पंकजाताई मुंडे यांना मंत्रीमंडळ विस्तारामध्ये स्थान न मिळाल्याबद्दल विचारणा केली असता त्यांनी यासंदर्भात भूमिका मांडताना सूचक प्रतिक्रिया दिली. मी मंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मंत्रिमंडळ बनवायचे असते, त्यात सगळ्यांना समाधानी करता येत नसते. पण जे मंत्री झाले आहेत, त्यांनी तरी लोकांना समाधानी करावे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
मला मंत्रीपद देण्याइतकी माझी पात्रता नसेल. अजून पात्रतेचे लोक असतील कदाचित. त्यांना जेव्हा माझी तेवढी पात्रता वाटेल तेव्हा देतील. त्याबद्दल मला काही आक्षेप नाही. माझे नाव चर्चेतील नाव आहे, माध्यमांच्या आणि कार्यकर्त्यांकडून माझ्या नावाची चर्चा झाली. आता माझे कार्यकर्ते आणि मी देखील शांत बसलो आहोत. त्यांना ज्यांची पात्रता आहे असे वाटेल, त्यांना ते मंत्रीपद देतील. त्यात माझी काही भूमिका असण्याचे कारण नाही. मी स्वाभिमानाने राजकारण करण्याचा प्रयत्न करते, अशा शब्दांत मुंडेंनी भावना व्यक्त केल्या.

सरकारकडून हे अपेक्षित नाही
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला सल्ला दिला आहे. ओबीसी आरक्षणाचा विषय पुन्हा एकदा दुर्लक्षित झाला आहे. पण या सरकारकडून हे अपेक्षित नाही. त्यांनी ओबीसी आरक्षणासाठी प्रयत्न करून ते मिळवावे. नाहीतर आम्ही इतकी वर्ष केलेल्या लढ्याला कगाही अर्थ राहणार नाही”, असं त्या म्हणाल्या.

येत्या मंत्रिमंडळ आणखी काहींना मंञीपदे मिळतील, यात प्रामुख्याने महिलांना संधी द्यावी. २०१४ ला भाजप – शिवसेना सरकारच्या काळात मी महिला असून मला ग्रामविकास सारखे खाते देण्यात आले होते. त्यामुळे मंत्रिमंडळात महिलेला स्थान तर दिलेच पाहिजे, पण केवळ महिला अन् बालविकास नाही तर मोठ्या खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिली जावी​ अशी अपेक्षा यावेळी त्यांनी बोलून दाखवली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!