संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क पाथर्डी– तालुक्यातील ढाकनवाडी(वडगांव) या ठिकाणी सालाबाद प्रमाणे श्रावणी अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या भक्तिभावाने गुरुवारी ( दि.११ )पासून प्रारंभ झाला आहे.


सप्ताह काळात पहाटे ४ ते ६ काकडा भजन , ६ ते ७ विष्णु सहस्त्रनाम , ७ ते ११ सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण , ११ ते १२ गाथा भजन , ५ ते ३ भोजन , ५ ते ६ हरिपाठ ६ ते ८ भोजन , रात्री ९ ते ११ हरिकिर्तन व नंतर हरिजागर आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
पवित्र अश्या श्रावण महिन्याच्या अनुषंगाने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन ढाकनवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
सप्ताहातील कीर्तनसेवा याप्रमाणे- दि.११ऑगस्ट रोजी काशिनाथ महाराज नागतळा, दि.१२ ज्ञानेश्वर महाराज केंद्रे (आळंदी), दि.१३ श्रीहरी महाराज खेडकर (आळंदी), दि.१४ श्री १००८ महामंडलेस्वर त्रिविक्रमानंद शास्त्री इंदूवशींनी (देवी संस्थान पिंपळनेर), दि.१५ विवेकांनंद शास्त्री ( शिरूर कासार), दि.१६ रामगिरी महाराज (येळेेश्वर संस्थान येळी), दि.१७ जगन्नाथ महाराज शास्त्री (कारेगाव), दि.१८ रोहिदास शास्त्री धर्माजीराजे (संस्थान हातोला) यांचे कीर्तन होणार आहेत.
दि. १९ विठ्ठल महाराज शेकडे (गहिनींनाथगडकर) यांचे सकाळी ८ते १० काल्याचे कीर्तन होणार आहे .
नंतर दिंडीप्रदक्षिणा व त्यानंतर समस्त गावकरी मंडळी यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले आहे. भाविक भक्तांनी या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन सप्ताह कमिटी ढाकनवाडी व ग्रामस्थांनी केले आहे.
✍संकलन-पत्रकार सोमराज बडे


