संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात जामखेड रस्त्यावरील तक्षशिला स्कूलच्या शिक्षक व विद्यार्थी विद्यार्थिनी बुधवारी (दि.१०) मोठ्या उत्साहाने रक्षाबंधन साजरा केला. यावेळी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना विद्यार्थिनी राख्या बांधल्या, तर विद्यार्थ्यांनी विविध वृक्षाची रोपे भेट दिली.

यावेळी तक्षशिला स्कूलच्या सौ कोमल उज्जैन, समन्वयक उज्वला राजे, विश्वास बडेकर, शीतलोटा गोवर्धन शेलार, किरण पठारे यांच्यासह तक्षशिला शाळेतील विद्यार्थी- विद्यार्थिनींनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सपोनि शिशिरकुमार देशमुख, मपोउपनि मुगडे मॅडम, पोना भानुदास खेडकर, धोंडे, सुरेश नाईक, गोरे, राहुल द्वारके, पोहेकॉ बारगजे, मिसाळ, अडसूळ, सफौ सोनार, वराट, डोळे, वैरागर, मपोना कांबळे, जाधव आदिंसह अन्य पोलिस कर्मचा-यांना राख्या बांधून व विविध वृक्षाची रोपे भेट दिली.
या दरम्यान भिंगार पोलीस ठाण्यातील पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचा-यांनी तक्षशिला शाळेतील विद्यार्थ्यांना शस्त्र कसे हाताळावेत व शस्त्र संबंधित माहिती दिली.


