संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी – तालुक्यातील चिंचपूर पांगुळ येथे सालाबाद प्रमाणे श्रावणी अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या भक्तिभावाने दि.८ ऑगस्ट पासून प्रारंभ झाला आहे. या हरिनाम सप्ताहात रोज पहाटे ४ ते सकाळी ६ वा. काकडा आरती, सायंकाळी ५ ते ६ वा.हरिपाठ व रोज रात्री ७ ते ९ कीर्तन व दररोज कीर्तन संपल्यानंतर ९ ते १० वा महाप्रसादाचे आयोजन आहे.
यानंतर अन्य धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. पवित्र अश्या श्रावण महिन्याच्या अनुषंगाने व श्री रामगड संस्थांनचे संस्थापक मठाधिपती वै.रामभक्त वामनदेव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन चिंचपूर पांगुळ ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

सप्तहाची पहिली किर्तनरूपी माळेतीळ पहिले पुष्प भगवान महाराज ढाकणे बोधेगावकर यांनी गुंफले.
“सत्कर्म करा,सज्जनांची संगत करा दुर्जनापासून चार हात दूर राहा.”असा मौलिक संदेश भगवान महाराज ढाकणे यांनी आपल्या पहिल्या किर्तनसेवेतून दिला.
सप्ताहातील उर्वरित कीर्तनसेवा याप्रमाणे- दि.९ ऑगस्टला हरिदास महाराज दिघोळकर ,दि.१० गहिनाथ महाराज खेडकर पारगावकर, दि.११ जगन्नाथ महाराज गर्जे (स.)कारेगावकर, दि.१२ मुरलीधर महाराज पिंपळनेरकर, दि.१३ विष्णू महाराज आंधळे, दि.१४ त्रिविक्रमशास्त्री महाराज इदुवासींनी देवी, यांची कीर्तन होणार आहेत. तर दि.१५ वै. रामभक्त वामनदेव महाराज यांच्या समाधीस अभिषेक करण्यात येणार आहे.
त्यानंतर विठ्ठल महाराज शेकडे गहिनींनाथगडकर यांचे सकाळी १० ते १२ वा. काल्याचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले आहे. सर्व भाविकांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सप्ताह कमिटी चिंचपूर पांगुळ व ग्रामस्थांनी केले आहे.
👉संकलन:पत्रकार सोमराज बडे


