संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी-: (बाबा ढाकणे) अहमदनगर जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणासाठी नुकत्याच जाहीर झालेल्या आरक्षणानंतर सर्वच ठिकाणी गट,गण आरक्षणानंतर सर्वच पक्षात पक्षाचे संभाव्य उमेदवार आपण राहावेत, यासाठी पक्षातील प्रत्येक इच्छुकांनी आपआपल्या पर्यायाने पक्षश्रेष्ठीकडे आपला गट,गणात कसा जनसंपर्क आहे, पक्षासाठी किती लोकहितवादी कामे केली आहेत, त्याचबरोबर आपण किती खर्च करू शकतो, असा सर्व अहवाल मांडून आपल्याला उमेदवारी द्यावी, यासाठी सर्वच पक्षाकडे इच्छुकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. यात विशेषतः पाथर्डी तालुक्यातील टाकळीमानूर जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण तर टाकळीमानूर गण अनुसूचित महिला व माणिकदौंडी गण सर्वसाधारण असे आरक्षण पडले आहे. यामुळे नेमके टाकळीमानूर गण अनुसूचित महिला आरक्षित झाल्याने येथील इच्छुकांनी आपला मोर्चा टाकळीमानूर जिल्हा परिषद गटाकडे वळविला आहे. त्यामुळे गणापेक्षा टाकळीमानूर जिल्हा परिषद गटात भाजप, राष्ट्रवादी अथवा अन्य पक्षाचे संभाव्य उमेदवार कोण? याची उत्सुकतेने चांगल्याच चर्चा रंगू लागल्या आहेत. अखेर या जाहीर झालेल्या आरक्षणात पुन्हा बदल झाल्यास पक्षांसह इच्छुक उमेदवारांना पुन्हा मोठी कसरत करावी लागले हे पण दुर्लक्षित करून चालणार नाही. त्यामुळे काहींजण सावध भूमिका घेत आहेत.
मागील जिल्हा परिषद पंचवार्षिक निवडणुकीकडे दृष्टिक्षेप टाकल्यास आमदार मोनिकाताई राजळे असताना त्यांचे पतीराज माजी आमदार कै.राजीव राजळे हे होते, त्यात मोठा गाजावाजा करत दक्षिणेचे झालेले खासदार डाॅ सुजय विखे पा. हे होते. या सर्वासह शेवगाव-पाथर्डी तालुक्यावर भाजपाच्या नेत्या व माजीमंञी पंकजाताई मुंडे यांचा विशेषतः त्यावेळी ऐकणारा वर्ग होता. आज तालुक्यात परिस्थिती वेगळी आहे, असो… त्यावेळी टाकळीमानूर गटातून माजी आमदार कै.दगडू पा.बडे यांचे चिरंजीव अहमदनगर भाजपा उपाध्यक्ष तथा माजी सरपंच, युवानेते धनंजय पा.बडे यांना भाजपाचे नेते कै.गोपीनाथ मुंडे यांच्याजवळचे नातेसंबंध पाहाता भाजपाकडून उमेदवारी देणे क्रमप्राप्त होते. पण ऐनवेळी तसे झाले नाही, अथवा एकप्रकारे तालुक्याच्या राजकीय दृष्ट्या पुढील विचार करून राजकीय खच्चीकरण करण्यासाठी मोठी खेळी खेळली गेली. पण ही बाब बडे पा. घरण्याच्या मोठी जिव्हारी लागली. कारण हातात आलेला घास हिसकावून घ्यावा, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण याही परिस्थितीत दुसरा कोणताही निर्णय न घेता युवानेते धनंजय पा.बडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी तन-मन-धनाने पक्षाने दिलेल्या आदेशाचे पालन करीत काम केले. ही बाब दुर्लक्षित करून चालणार नाही, त्यामुळेच येत्या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत युवानेते धनंजय पा बडे यांना भाजपाकडून उमेदवारी मिळणारचं, असे मानून बडे पा. यांचे कार्यकर्ते कामाला लागले आहे. तर काही कार्यकर्त्यानी थेट पक्षश्रेष्ठींना भेटून निष्ठावानांना न डावलता,चिंचपूर पागुंळ न्याय द्यावा, अशी आग्रहाची मागणी केली, असल्याची चर्चा आहे.
तालुक्यातील राजकीय परिस्थिती व पक्षीय बलाबल पाहता भाजप, शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्याच प्रमाणे वंचित बहुजन आघाडी,तसेच आम आदमी पार्टी, शिवाय अनेक अपक्ष उमेदवारही निवडणूक आखाड्यात उतरवणार असल्याचे बोलले जात आहे. नुकतेच महाराष्ट्रात झालेले सत्तांबद्दल यामुळे पाथर्डी तालुक्यातील भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा थेट निवडणूक सामना होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. तरीही शिवसेना, काँग्रेस या पक्षांची महत्वपूर्ण भूमिका या निवडणुकीत असणार आहे.
👉भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसचे समजले जाणारे संभाव्य उमेदवारांच्या प्रतिक्रिया
भाजपा 👉युवानेते धनंजय पा बडे

भाजपाकडून १०० टक्के पाथर्डी तालुक्यातील टाकळीमानूर जिल्हा परिषद गटाची उमेदवारी मिळेल. त्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने पक्षश्रेष्ठीकडे उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहोत. यापूर्वी आपण पक्षाचा आदेश मानून गेली ५ वर्षा थांबलो. यानंतर सर्व हेवेदावे विसरून पक्षाचे तन-मन -धनाने काम करत आहोत. यामुळे यावेळी पक्ष टाकळीमानूर गटातून मलाच नक्कीच उमेदवार देईल, अशी प्रतिक्रिया अहमदनगर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा युवानेते धनंजय पा. बडे यांनी दिली
👉भाजपा 👉माजी जि.प.सदस्य अर्जुन शिरसाट / जि.प.सदस्य ललिताताई अर्जुन शिरसाट

टाकाळीमानूर जिल्हा परिषद गटातून भाजपा पक्षश्रेष्ठीकडून पुन्हा उमेदवारी मिळणारचं आहे. उमेदवारी मला मिळाल्यास पुन्हा पूर्ण ताकदीने निवडणूक लढणार आहे, अशी प्रतिक्रिया माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन शिरसाट यांनी दिली आहे.
👉राष्ट्रवादी काँग्रेस -👉 माजी सभापती गहिनीनाथ शिरसाट/ उज्ज्वल गहिनीनाथ शिरसाट

पाथर्डी-शेवगाव तालुक्याचे नेते ॲड.प्रतापकाका ढाकणे यांच्याकडे यापूर्वी पूर्वश्रमी टाकळीमानूर जिल्हा परिषद गटात केलेली लोकहितवादी कामाचा लेखाझोका मांडून, राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी आम्हाला द्या, अशी मागणी करणार आहोत. यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमचे नेते नक्कीच माझी पत्नी उज्ज्वल गहिनीनाथ शिरसाट यांना उमेदवारी देतील. उमेदवार मिळाल्यावर निवडून येऊच, पण टाकळीमानूर गटात जास्तीतजास्त निधी आणून जनतेसाठी कामे करून दाखवू, असा विश्वास माजी सभापती गहिनीनाथ शिरसाट यांनी व्यक्त केला आहे.
👉राष्ट्रवादी काँग्रेस 👉 डाॅ.राजेंद्र खेडकर

आमचा पक्ष म्हणजे पाथर्डी-शेवगाव तालुक्याचे नेते ॲड.प्रतापकाका ढाकणे हे आहेत. आत्तापर्यंत ॲड प्रतापकाका ढाकणे यांचेच आपण तनमनधनाने कामे करत आलो आहोत. यापूर्वी मी पंचायत समिती सदस्य होतो. या काळात मी जनहिताची कामे केली आहेत. यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून मला नक्की टाकाळीमानूर जिल्हा परिषद गटातून उमेदवारी देतील, अशी प्रतिक्रिया माजी पंचायत समिती सदस्य डाॅ राजेंद्र खेडकर यांनी दिली.
👉राष्ट्रवादी काँग्रेस 👉 नितीन बारगजे

आम्ही आत्तापर्यंत पक्ष म्हणूनच ढाकणे घरण्याबरोबर राहिलो आहोत. टाकाळीमानूर जिल्हा परिषद गटात आमचा सर्वसामान्यांशी सलोख्याचे संबंध आहेत. जनसेवेसाठी टाकाळीमानूर जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारीची संधी द्यावी, अशी मागणी केली आहे. या मागणीचा विचार करून पाथर्डी शेवगाव तालुक्याचे नेते ॲड.प्रतापकाका ढाकणे हे आम्हाला नक्कीच संधी देतील, अशी प्रतिक्रिया युवानेते तथा खंदेसमर्थक नितीन बारगजे यांनी दिली.


