दरोडा गुन्ह्यात १४ वर्षापासून फरार असणारा आरोपी ‘एलसीबी पथका’ने पकडला

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर –
न्यायालयाकडील दरोड्याच्या गुन्ह्यातील १४ वर्षापासून फरार असलेला स्टॅण्डींग वॉरंटमधील आरोपी पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. शंकर विजय जगधने (वय ३२, रा. एकलव्य वसाहत, राहुरी खु, ता. राहुरी ) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. स्वाती भोर मॅडम, श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार आदेशान्वये सफौ विष्णु घोडेचोर, पोना शंकर चौधरी, पोकॉ रोहित येमुल, पोकाॅ सागर ससाणे, पोकॉ रणजीत जाधव आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

याबाबत समजलेले माहिती अशी की, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी मोहरम, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जयंती, पारसी नवीन वर्ष व गोपालकाला या आगामी सण उत्सवाचे अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यातील फरार, पाहिजे आरोपी तसेच स्टॅण्डींग वॉरंट, नॉनबेलेबल वॉरंट व बेलेबल वॉरंटमधील आरोपींची माहिती काढून त्यांचेविरुध्द कारवाई करण्याबाबत पोनि श्री. कटके यांना सूचना दिल्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथकाची नेमणूक करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
राहुरी परिसरातील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय, अहमदनगर यांचेकडील दरोड्याच्या गुन्ह्यातील एसीसी क्र. १७४/२००८ मधील फरार आरोपी शंकर विजय जगधने हा सन २००८ सालापासून फरार होता. त्याचा राहुरी व परिसरात गुप्तबातमीदारा मार्फत माहिती घेऊन शोध घेत असतांना तो त्याच्या राहत्या घरी येणार आहे, अशी माहिती मिळाली. पथकाने एकलव्य वसाहत, राहुरी खु येथे जाऊन सापळा लावून थांबलेले असतांना आरोपी शंकर जगधने यांचे वर्णनासारखा इसम येतांना दिसला त्यास ताब्यात घेऊन त्यांचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव शंकर विजय जगधने असे सांगितल्याने त्याचेकडे उपलब्ध कागदपत्रांची पडताळणी करता स्टॅण्डींग वॉरंटमधील आरोपी हाच आहे, अशी स्थानिक गुन्हे शाखा पथकाची खात्री होताच त्यास ताब्यात घेऊन पुढील आवश्यक कारवाई करीता राहुरी पोलीस ठाण्यात हजर केले आहे. पुढील कारवाई राहुरी पोलीस करीत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!