संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण याबाबत नुकत्याच जाहीर झालेल्या आरक्षणात नगर तालुक्यातील पंचयात समिती गणाबाबत आदिवासी, पारधी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष राम चव्हाण यांच्यासह पदाधिका-यांनी लेखी हरकत निवडून अधिका-याकडे केली आहे.

आदिवासी, पारधी विकास परिषद जिल्हाध्यक्ष श्री चव्हाण यांनी निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाअधिकारी यांच्याकडे केलेल्या हरकत अर्जामध्ये म्हटले की, कार्यालयामध्ये नगर तालुका (जि. अहमदनगर) या पंचयात समिती गणामध्ये आरक्षण सोडत नुकतीच निघालेली आहे. नगर तालुका सोडून बाकी पूर्ण जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमाती राखीव जागा पडल्या आहेत. नगर तालुकामध्ये पंचयात समिती अनुसूचित जमातीची लोकसंख्या ३ हजार ते ४ हजार आहे, तरी आदिवासी समाजावर नगर तालुक्यामध्ये अन्याय होत आहे. आपले कार्यालयाने नगर तालुका पंचयात समिती गण व गटचे आरक्षणबाबत संपूर्ण चौकशी करून यामध्ये अनुसूचित जमातीच्या लोकांचे आरक्षण समाविष्ट करावा व अनुसूचित जमातीच्या लोकांना न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे.
यावेळी सावता चव्हाण, इंद्रजीत चव्हाण, महेश चव्हाण, बाळासाहेब काळे अक्षय चव्हाण, बंटी भोसले, शुवम चव्हण, करण काळे आदिंसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


