संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- शहरातील काही दिवसांपूर्वी बेकायदा ऑनलाईन लॉटरी व बिंगो जुगा-यांवर नाशिक परिक्षेत्र आयजी पथकाने छापेमारी करीत, संबंधितांवर गुन्हे दाखल केले होते, या गुन्ह्यात अधिकारी तपास करून गुन्हे दाखल असल्यांना जास्तीतजास्त शिक्षा व्हावी, या हेतूने अभ्यासपूर्ण अजून कलमे वाढविण्यात आले आहे. यात वाढीव कलमे भा.द.वी 174 ,177, 181, 182 ,188 तसेच 419 प्रमाणे प्रामुख्याने आरोपी पंडीत पोकळे (रा बीड) याचेवर कलमे लावण्यात आली आहेत.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डाॅ बी जी शेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास विशेष पथकाचे पोनि बापू रोहोम, एपीआय सचीन जाधव, पोह शकील अहमद शेख, पोह सचिन धारणकर, प्रमोद मंडलिक, कुणाल मराठे आदींचे पथक हे तपास करीत आहे.
यापूर्वी अहमदनगर शहरांमध्ये नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉ.बी जी शेखर पाटील यांनी अवैध धंद्याचे उच्चाटन करणे कामे स्थापित विशेष पथकाने अहमदनगर शहरात बेकायदा व विनापरवाना ऑनलाईन लॉटरी सट्टा चालक व मालकावर तसेच बिंगो केंद्रावर छापे मारून कारवाई केली होती. या छाप्यामध्ये ज्ञानेश्वर वसंतराव तनपुरे, राकेश बालराज गुंडू , निलेश कृष्णा लोखंडे, आनंद लोढा ( रा कोपरगाव), पंडित पोकळे (रा बीड), शाम बाळू अंडागळे, विजय लक्ष्मण शिंदे, विकास दिलीप भिंगारदिवे, यासीन रजक शेख, अशोक दामोदर कावळे, रामभाऊ सदाशिव घुले, प्रवीण अनिल टेकाळे, बाबा महबूब शेख, प्रकाश बबन गायकवाड, महेंद्र माखीजा (रा. अहमदनगर ), कैलास जावळे ( रा. अहमदनगर ) आदिंवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली होती. या सर्व जुगारी महाशयांवर अधिक कडक शिक्षा व्हावी, यासाठी या गुन्ह्यातील तपासामध्ये डॉ. बी जी शेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी यांच्यावर धडाकेबाज कारवाई करीत या तपासामध्ये दणका देत वाढीव कलमे लावण्यात आली आहेत.


