जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध दारू अड्डयावर छापे ; २६ गुन्हे दाखल, २४ आरोपी अटक 

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर ः
येथील राज्य उत्पादन शुल्क  कार्यालयाने अवैध दारूविरूद्ध मोठी मोहीम उघडून २६ गुन्हे दाखल केले असून,  २४ आरोपी अटक करण्यात आली आहे.


याबाबत समजलेले माहिती अशी की, अहमदनगर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे
अधीक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरु असणा-या अवैध दारू, हातभट्टी विरोधात दि.२२ ते २६ जुलै या कालावधीत भरारी पथकाने मोठी धाडसञ मोहिम राबवली होती. या मोहिमेत अहमदनगर जिल्ह्यामध्ये  २६ गुन्हे दाखल करण्यात आली असून, यात २४ आरोपींना अटक केली आहे.
यात भरारी पथकाने धाडसञामध्ये  ९५ लिटर देशी दारू, १३ लिटर विदेशी दारू, ३१६ लिटर हातभट्टी, तीन हजार ९८५ लिटर दारूचे कच्चे रसायन, ८५ लिटर ताडी असा एकूण एक लाख ७५ हजार ३०६ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
श्रीरामपूर भरारी पथकाने दि.२४ जुलैला कोल्हार घोटी रस्ता, इंदोरी फाटा येथील हॉटेल सह्याद्री, तसेच हॉटेल रूद्र, लहित खुर्द (ता. अकोले) येथे छापे टाकून ३३० लि. देशीदारू, ७ लिटर विदेशीदारू असा एकूण १ लाख ३२ हजार ९१० रूपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.
भरारी पथकाने दि. २६ जुलै रोजी झगडेफाटा चौफुली (ता. कोपरगाव) येथे छापा टाकून चारचाकी वाहनातून अवैधरित्या देशी, विदेशी दारूसह एकूण ५ लाख ६८ हजार ७८० रूपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. कारवाईत एका जणाला अटक करण्यात आली आहे. या धडक मोहिमेत जिल्ह्यात एकूण २६ गुन्हे नोंद दाखल करून २४ आरोपींना अटक करण्यात आलेली आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!