👉पैठणहून आणलेल्या पाण्याने जलभिषोक
👉याञात्सोवात गुळ शेरणी, मलिदा प्रसाद वाटप
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी- तालुक्यातील येळी येथील बडेवाडी मलकेश्र्वराची याञा शुक्रवारी (दि.१५) मोठ्या उत्साहात पार पडली.
याञात्सोवात शुक्रवारी प्रारंभी सकाळी पैठण येथून कावडीने येळी- बडेवाडी तरुण भाविकांनी आणलेल्या पाण्याने मलकेश्र्वरास जलभोषिक झाला. दरम्यान कावडीने पाणी आणणा-या भाविकांचा मोठ्या जल्लोषात गावक-यांनी स्वागत केले. कावडी पाणी घेऊन आलेल्या भाविकांना वाजतगाजत उंच डोंगरावर असणा-या मलकेश्र्वर देवस्थान ठिकाणी गावक-यांनी नेले.
यावेळी मलकेश्र्वरास जलभिषेक झाल्यानंतर ग्रामस्थांनी मलकेश्र्वराचे मोठ्या भाविक मनाने दर्शन घेतले. देवस्थान परिसरात भाविकांनी सोबत आणलेल्या गुळ शेरणी, मलीदा तसेच पेढे देवास वाढविण्यात आला. यानंतर त्याचा प्रसाद हा उपस्थितीत भाविकांना प्रत्येक भाविकांनी एकमेकांना वाटला. तसेच भाविकांनी सोबत आणलेल्या जेवणाचा आस्वाद मलकेश्र्वर देवस्थान येथे घेतला.
याञात्सोवात येळी-बडेवाडी स्थानिक ग्रामस्थांसह कामानिमित्ताने बाहेरगावी असणारे ग्रामस्थ सहभागी झाले होते.



