संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर – गेल्या काही दिवसांच्या घडामोडीनंतर राज्याचे नूतन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा नगर शहर जिल्हा भाजपाच्यावतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी मुंबई येथे अभिनंदन करुन सत्कार केला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी महेंद्र गंधे म्हणाले, भाजप-शिवसेनेची युती ही नैसर्गिक आहे, मध्यंतरीच्या काळातील घडामोडीनंतर आता ही युती पुन्हा झाल्याने भाजप-सेनच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. यापुढील काळात स्थानिक पातळीवरही ही युती अभेद्य राहील. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नगरमध्ये चांगले काम करुन महानगरपालिकेत युतीची सत्ता येण्यासाठी प्रयत्न करु, असे सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देंवेंद्रजी फडणवीस आता युतीच्या सर्व पदाधिकार्यांनी एकत्रित येत नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम करावे. त्यांना ताकद व सर्वोतोपरि मदत करण्यासाठी आम्ही कटीबद्ध राहू. नगरच्या प्रश्नांसंदर्भात आम्हा दोघांनी चांगली माहिती असल्याने ते प्रधान्यांने सोडविले जातील, असे सांगितले.
यावेळी महेंद्र गंधे, अरुण मुंढे व पदाधिकार्यांनी विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा केली.



