संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर – राहुरी तालुक्यातील वर शिंदे येथील महिला सरपंच सौ सोनाली दत्तू आहेर यांचे सासरे एकनाथ आहेर व दीर संजय एकनाथ आहेर यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून घरकुल बांधून एकत्रित कुटुंबात राहात आहे. या कारणास्तव सरपंच सौ सोनाली दत्तात्रय आहेर यांना अपात्र करण्याचा निर्णय नुकताच अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी पारित केला.
याबाबत समजलेले माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील वर शिंदे येथील महिला सरपंच सौ सोनाली दत्तू आहेर यांचे पती व सासरे हे सर्वजण एकत्र कुटुंबात राहतात. पण सरपंच सौ सोनाली आहेर याचे सासरे व दीर संजय यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केले असल्याबाबत पुराव्यानिशी संदीप लक्ष्मण वाळेकर यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे अर्ज करुन सरपंच सोनाली आहेर यांना अपात्र करण्याकामी विनंती केलेली होती. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी याप्रकरणी गटविकास अधिकारी यांचा अहवाल मागून आलेल्या अहवालाचे अवलोकन करून संपूर्ण कागदोपत्री पुरावे पाहाता सरपंच सौ. सोनाली दत्तात्रय आहेर यांचे सासरे व दीर यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याचे निष्पन्न झाले. यामुळे सरपंच सौ.आहेर या सरपंचपदासाठी अपात्र म्हणून घोषित केले आहे.
संदीप वाळेकर यांच्या वतीने ॲड. गोरक्ष पालवे यांनी कामकाज पाहिले. त्यांना ॲड रोहित बुधवंत बाळकृष्ण गीते यांनी सहाय्य केले.



