संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी शिवशक्ती सेना पक्षाच्या अध्यक्षा करुणाताई मुंडे व पक्षाचे युवानेते बाबुराव बडे (मुंबई) येथे तीन तास चर्चा झाली. यावेळी पक्षाचे कार्यकर्ते रमेश गिरे . शेषराव बाबासाहेब जाधवर. बबन श्रीरंग पवार. तसेच गेवराई तालुक्यातील मादळमोही सर्कलचे युवा नेतृत्व जालिंदर काशीराज जाधवर. अजयकुमार देडे इतर मान्यवर उपस्थित होते.
बैठकीच्या वेळी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात जनसंपर्क यात्रा काढायची असे मत युवा नेते बाबुराव बडे यांनी व्यक्त केले. पक्षबांधणीसाठी पुणे येथे पक्षातील कार्यकर्त्यांची लवकरच बैठक होईल. गोरगरिबांचा आणि अन्याय विरुद्ध लढणाऱ्या यांचा सर्वसामान्यांचा पक्ष आहे आणि महिला विरुद्ध अन्याय सहन केला जाणार नाही, असे आणि लवकरच संत भगवान बाबा चे दर्शन घेण्यासाठी भगवान गडावर येणार करुणाताई धनंजय मुंडे यांनी सांगितले.
लवकरच संपूर्ण महाराष्ट्रभर जनसंपर्क यात्रा काढणार आसे पक्षाचे युवानेते बाबुराव बडे यांनी सांगितले.


