नगरसेवक सचिन शिंदे यांच्या प्रयत्नातून संपवेलचे लोकार्पण आश्वासनांची पूर्तता : महापौर रोहिणी शेंडगे


 संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर –
नगर शहराचा लगतचा भाग म्हणून कल्याण रोड ओळखला जातो. गेल्या काही वर्षात या भागात झालेल्या विविध विकास कामांमुळे नागरी वस्ती वाढत आहे. या वसाहतींना सुविधा पुरविण्यासाठी आम्ही सर्व कटीबद्ध राहून काम करत आहोत. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता विविध कामांच्या माध्यामातून होत आहे. या भागातील सर्वात जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न होता, विशेषत: महिलांची नेहमीच याबाबत विचारणा होत असे. त्यामुळे मी या भागाची प्रतिनिधी असल्याने महापौर झाल्यानंतर या भागातील पाणी प्रश्नास प्राधान्य देत सोडविण्यासाठी प्रयत्न केला. आज संपवेलचे लोकार्पण करुन या भागाचा पाणी प्रश्न कायमचा मिटविण्याचा प्रयत्न केला आहे. या भागातील नगरसेवकांचा पाठपुरावा महत्वाचा ठरला असल्याचे प्रतिपादन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले.


    नगरसेवक सचिन शिंदे यांच्या प्रयत्नातून कल्याण रोड, गणेशनगर येथे नव्याने बांधण्यात आलेल्या संपवेलचा लोकार्पण सोहळा महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी उपमहापौर गणेश भोसले, माजी विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे, शाम नळकांडे, सुवर्णा जाधव, प्रशांत गायकवाड, युवराज खैरे, दत्ता जाधव, सविता शिंदे, खासेराव शितोळे, इंजि.परिमल निकम, आर.जी.सातपुते, गणेश गाडळकर आदि उपस्थित होते.
    याप्रसंगी उपमहापौर गणेश भोसले म्हणाले, शहराच्या आजुबाजूचा परिसर चांगल्या पद्धतीने वाढत आहे. या भागाला मनपाच्या माध्यमातून मुलभुत सुविधा पुरविण्यात येत आहे. नुकतेच या भागासाठी 20 कोटीची निधी उपलब्ध करुन दिला असल्याने या भागातील विकास कामांना चालना मिळून या भागाचा कायापालट झालेला दिसेल. आज प्रत्येक भागात पाणी प्रश्न महत्वाचा झाला असून, आजच्या संपवेलच्या लोकार्पणमुळे या भागाचा पाणी प्रश्न नक्कीच मिटेल. पाणी प्रश्नांबाबत माजी महापौर शिलाताई शिंदे, सुरेखाताई कदम आणि आताच्या महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी महिलांचा जिव्हाळ्याच्या पाणी प्रश्नांना प्राधान्य दिल्याचे आवर्जुन सांगितले.
    याप्रसंगी सचिन शिंदे म्हणाले, कल्याण रोड भागातील नागरिकांना सर्वप्रकारच्या मुलभुत सुविधा मिळाव्यात यासाठी आपण कायम पाठपुरावा करुन प्रत्येक वसाहतीतील ड्रेनेज, रस्ते, स्ट्रीट लाईट हे प्रश्न सोडवित आहेत, परंतु सर्वात महत्वाचा पाण्याचा प्रश्नांसाठी कायम पाठपुरावा केला. त्यामुळे आज लोकार्पण होत असलेल्या संपवेलमधून या भागातील नागरिकांना पाणी पुरवठा होईल व गेल्या अनेक वर्षांची पाणी समस्या सुटेल, असा विश्वास व्यक्त केला.
    प्रास्तविकात इंजि.आर.जी.सातपुते यांनी या संपवेल व येथील पाणी टाक्यांमधील पाणी पुरवठा,क्षमता याबाबतचे नियोजनाबाबत सांगितले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पारुनाथ ढोकळे यांनी केले तर आभार शाम नळकांडे यांनी मानले.  याप्रसंगी भाऊसाहेब थोटे, सुधाकर थोरात, अंबादास नरसाळे, नितीन लबडे, परमेश्वर पाटील, सागर गांधी, ताराचंद भणगे, पोपटराव झावरे, भाऊसाहेब अडसूळ, उत्तमराव राजळे, संजय भापकर, मार्क्स भांबळ, संजय गोसावी, बाबासाहेब कोतकर, गणेश बरकडे, तान्हाजी काळूंगे, दिनकर आढाव, नामदेव गुंड, उत्तमराव शिंदे,एकनाथ व्यवहारे, सतीश शिंदे आदिंसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!