कार्यकर्ता हा पक्षाचा जनाधार असल्याने अशा कार्यकर्त्यांचा पक्षाने नेहमीच सन्मान केला- शाम जाजू
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
कार्यकर्ता हा पक्षाचा जनाधार असल्याने अशा कार्यकर्त्यांचा पक्षाने नेहमीच सन्मान केला- शाम जाजू
अहमनगर – भाजपा हा शिस्तबद्ध पक्ष आहे, पक्षात पदापेक्षा कामाला महत्व दिले जाते. काम करणार्या कार्यकर्त्यांना मेहनतीचे फळ मिळतेच. तेव्हा आपण काम करत रहा, पक्ष आपल्या कार्याची दखल घेऊन आपल्यावर योग्य ती जबाबदारी देत राहील. ग्राऊंडपासून काम करणारा कार्यकर्ता हा पक्षाचा जनाधार असल्याने अशा कार्यकर्त्यांचा पक्षाने नेहमीच सन्मान केला आहे. मी संगमनेर सारख्या छोट्या शहरातून काम करत राहिलो त्यामुळे राष्ट्रीय उपाध्यक्षपदापर्यंतची जबाबदारी पक्षाने दिली. तेव्हा आपण काम करत रहा, असा सल्ला देऊन ते म्हणाले, आज पक्षाची देशात मजबूत स्थिती आहे. पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली देश व भाजपा प्रगतीपथावर आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना अनकुल अशी परिस्थिती आहे. भाजपही चांगले काम करणार्यांच्या पाठिशी उभे राहिल, असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष शाम जाजू यांनी केले.
भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू नगर येथे आले असता, भाजपाच्या पदाधिकार्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, ज्येष्ठ नेते वसंत लोढा, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, संतोष गांधी, शशांक कुलकर्णी, गिता गिल्डा, वसंत राठोड, अजय चितळे, प्रदीप परदेशी, रविंद्र बारस्कर, पल्लवी जाधव, लता शेळके, सोनाबाई शिंदे, किशोर कटोरे, लक्ष्मीकांत तिवारी, कुसुम शेलार, प्रिया जानवे, कालिंदी केसकर, लिला आगरवाल, छाया रजपुत, रियाज कुरेशी, अमोल निस्ताने, प्रशांत मुथा, गोपाल वर्मा, राजू घोरपडे, अशोक भोसले, रोहन शेलार, राजु मंगलाराप, सतीश शिंदे, सुमित बटूळे, सिद्धेश नाकाडे, नवनाथ टिमकारे, ज्ञानेश्वर धिरडे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी भैय्या गंधे म्हणाले, संगमनेर ते नवीदिल्ली असा मोठा प्रवास शामजी जाजू यांनी मोठ्या कष्टाने पार केला आहे. पक्षाच्या अस्तित्वासाठी व वाढीसाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. नगरमधील कार्यकर्त्यांना त्यांचे नेहमीच चांगले मार्गदर्शन व पाठबळ राहिले आहे. यापुढेही त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे नगरमध्ये चांगले काम करुन भाजपा नंबर एकच पक्ष करण्यासाठी आपण प्रयत्न करु, असे सांगितले.
याप्रसंगी वसंत लोढा, बाबासाहेब वाकळे आदिंनीही शाम जाजू यांच्या कार्याचा गौरव करुन पक्षाचे कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करु, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशांक कुलकर्णी यांनी केले तर आभार संतोष गांधी यांनी मानले. यानंतर शाम जाजू यांनी भैय्या गंधे यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी गंधे परिवाराच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.



