गुरुदत्त भक्ती धाम येथे सद्गुरु किसनगिरी बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी विविध धार्मिक कार्यक्रम

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर –
श्री दत्तात्रय भगवान व श्री समर्थ सद्गुरू किसंगिरी बाबा यांच्या कृपाशीर्वादाने व परम पूज्य गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज श्री क्षेञ देवगड देवस्थान यांच्या प्रेरणेने पाईपलाईन रोड येथील संत किसनगिरी नगर येथे गुरुदत्त भक्तीधाम येथे शुक्रवार दि.२५ मार्च रोजी पुण्यतिथी सोहळा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ६ ते ८ या वेळेत अभिषेक, नित्य, पूजा व आरती,सकाळी 9 ते 12 या वेळेत “श्री किसनगिरी विजय” ग्रंथ पारायण होईल.दुपारी 12 वाजता महाआरती करण्यात येणार आहे.महाआरती नंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. रात्री ९ ते ११ या वेळेत हभप गोरक्षनाथ दुतारे महाराज यांचा भजन संध्याचा कार्यक्रम होईल. या पुण्यतिथी सोहळ्याच्या कार्यक्रमास भाविकांनी मोठ्या संखेनी उपस्थित राहावे.असे आवाहन श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा नगर भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!