संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- नगर तालुक्यात तांञिक अडचणीसह पाईपलाईन फुटलण्याने अनेक ग्रामपंचायत हद्दीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याचे पाणी नळाला आलेच नाही. गावातील नागरिकांचे पाण्यासाठी खूपच हाल होत आहे. एक एक हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण फिरावे लागत आहे. नागरिकांना तातडीने पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी निवेदनाद्वारे जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडे अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेने मागणी केली आहे.
निवेदन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहिणकर, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आनंद रुपणर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सनिभैय्या खरारे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल लखन, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पाटोळे, अभिषेक भैय्या भगवाने, विकी चावरे,सुशिल मिश्रा,कुणाल बैद, संजय खरे, रामदास मोरे,धिरज बैद आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात म्हटले की, नगर तालुक्यातील नागरदेवळेसह ३३ गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गरीब,मध्यमवर्गीय असा वर्ग कायमचा रहिवासी आहे. महागड्या बाटल्या खरेदी करणे, खाजगी टँकरने पाणी मागवणे इ. त्यांना परवडत नाही .त्यामुळे पाण्यासाठी त्यांना वणवण करायची त्यांच्यावर वेळ आली आहे. नगर तालुक्यामध्ये पाणीपुरवठा करणारी मोठ्या जलवाहिनी फुटल्याने, तांत्रिक अडचण किंवा असल्या काही कारणामुळे गावात पाणीपुरवठा वीस ते पंचवीस दिवस बंद करण्यात येते. ऐन उन्हाळा तोंडावर असतांना तालुक्यात ग्रामपंचायत मार्फत पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय सुविधा उपलब्ध होत नाही.अश्या परिस्थितीमध्ये लोकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवता येणार नाही. ग्रामपंचायतीमार्फत ग्रामस्थांकडून १२ महिन्याचे पूर्ण पाणीपट्टी वसूल करण्यात येते. तालुक्यामध्ये वीस ते पंचवीस दिवसापासून लोकांना पिण्याचे पाणी नाही.
या सर्व गोष्टीवर गांभीर्याने लक्ष देऊन ग्रामपंचायतने लवकरात लवकर गावकर्यांना पिण्याचे पाणीची सोय उपलब्ध करून द्यावी, असे म्हटले आहे.





