संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
शेवगाव – शेवगाव पंचायत समिती सभागृहात नुकताच राष्ट्रीय लसीकरण दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून शेवगाव तालुका गट विकास अधिकारी महेश डोके, तालुका आरोग्य अधिकारी संकल्प लोणकर, दहिगाव-ने प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी कैलास कानडे कानडे, तालुका आरोग्य पर्यवेक्षक सुरेश पाटेकर आदी उपस्थित होते. यावेळेस तालुक्यामधील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरणात केलेल्या कामाबद्दल प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाच्या कामाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याण मुटकुळे यांनी केले. आभार आरोग्य सेविका श्रीमती उषा शिंदे यांनी मानले. दरम्यान कार्यक्रमांमध्ये कवी मिलिंद कांबळे यांनी कविता सादर केली.




