शिवसेनेची अजूनही वेळ गेलेली नाही, अडीच-अडीच वर्षाचा फॉर्मूला मान्य करून बॅक टू निर्णय घ्यावा, शिवसैनिकांची अशीच भावना : आठवले


संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क / व्हिडिओ
अहमदनगर-
आम्ही काय लगेच राष्ट्रपती राजवट लागू करणाऱ्यातील अजिबात नाही. राष्ट्रपती राजवट लागू होण्याच्या विषयी नाही, पण शिवसेना जर वेगळी लढली तर शिवसेनेचे 2 किंवा 3 खासदार पण निवडून येण्याची शक्यता नाही. त्यामुळे शिवसेनेने अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही अडीच- अडीच वर्षाचा फॉर्मूला मान्य करून बॅक टू निर्णय घेणे आवश्यक आहे. शिवसैनिकांमध्येही अशीच भावना आहे, असे अहमदनगर दौ-यावर असलेले केंद्रीय सामाजिक न्यायमंञी रामदास आठवले यांनी शनिवार (दि.१२) पञकारांशी बोलताना सांगितले.

श्री आठवले पुढे म्हणाले की,भाजपबरोबर जायला पाहिजे त्याचा विचार करून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निर्णय घ्यावा. अडीच-अडीच वर्षाचा फॉर्मूलावर भाजप-शिवसेनेत एकमत होऊ शकते. लॉंग पॉलिटिक्स करायचे असेल, तर शिवसेनेने भाजपबरोबर आले पाहिजेत. शिवसेनेला आपले नुकसान करायचे असेल तर काँग्रेस-राष्ट्रवादीवर गेलेले आहेत, पण यात शिवसेनेचा अजिबात फायदा होणार नाही. तिघे एकत्र लढतील अशी स्थिती अजिबात नाही. 2024 ची लोकसभा निवडणूक आम्ही चांगल्या ताकदीने लढू आणि ती जिंकू. विधानसभा ही भाजप आरपीआय महायुती जिंकू शकते. त्यामुळे आम्हाला काही अडचण नाही, आम्ही तयारीत आहोत. २०२४ मध्ये आमचे सरकार येणार असल्याचे श्री आठवले म्हणाले.
👉काँग्रेससह विरोधकांना हरविण्याचा भाजप एडीएचा नारा, आमच्याजवळ नरेंद्र मोदीसारखा चमकणारा तारा
काँग्रेससह विरोधकांना हरविण्याचा भाजप एडीएचा नारा, कारण की आमच्याजवळ नरेंद्र मोदी सारखा चमकणारा तारा आहे, असे म्हणत श्री आठवले पुढे म्हणाले की, गेल्या आठ वर्षांमध्ये कुठल्याही आमच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत. भ्रष्टाचार मिटवला पाहिजे, कमई करण्यास हरकत नाही, पण सरकारच्या खजिन्यामध्ये पैसा आला पाहिजे. जीएसटी, इन्कम टॅक्स भरला पाहिजे. ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, एलेक्शन कमिशन असेल किंवा पत्रकारिता असेल किंवा न्यायालय ही सर्व यंत्रणे इंडिपेंडेंट आहेत. सरकारच्या अधिपत्याखाली असले तरी सरकारच्या आदेशाने ती यंत्रण चालत नाहीत. सरकारचे अनेक वेळा न्यायालय ऐकत नाही. त्यामुळे सरकार कुठल्यातरी सत्ताधारी लोकांची चौकशी करायला लावते, हा आरोप तथ्यहीन असल्याचे श्री आठवले यांनी सांगितले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!