जोगेवाडी येथे महिला दिन साजरा


संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी –
तालुक्यातील जोगेवाडी येथे महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित संजयगांधी निराधार योजनेच्या कार्यकर्ती मीरा बडे, तसेच शोभा बडे, वैशाली बडे,सविता बडे शहाबाई बडे,सुनीता बडे , तसेच गावातील महिला आणि किशोरवयीन मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रथमतः क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.

उपस्थित महिला आणि किशोरवयीन मुलींचे अंगणवाडी सेविका अलका होडशीळ यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी मीरा बडे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला . याप्रसंगी बोलताना बडे म्हणाल्या की स्त्रियांनी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने जागरूक राहिले पाहिजे,तसेच शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध सोयीसुविधांचा,कल्याणकारि योजनांचा अंगणवाडी कार्यकर्ती सेविका यांच्या मदतीने लाभ घेतला पाहिजे. तत्पूर्वी महिला दिनाचे औचित्य साधून झालेल्या एका कार्यक्रमात कर्तबगार महिला सन्मान पुरस्कार मंगलताई म्हस्के यांच्या हस्ते मीरा बडे यांना देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुसुम ढाकणे यांनी केले. आभार पद्मा बडे यांनी मानले.

संकलन@पत्रकार-सोमराज बडे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!