संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
राहाता (कोडिराम नेहे)– दि अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव बँक लिमिटेड अहमदनगर देनार जिल्ह्यातील पात्र शेतकरी सभासदांना सोलर पंपासाठी दीर्घ मुदतीचे कर्ज, काल दि. ५ मार्च २०२२ रोजी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तालुका विकास अधिकारी अधिकारी कार्यालय राहाता या ठिकाणी बँकेचे चेअरमन ॲड. उदय शेळके तसेच बँकेचे उपाध्यक्ष व सहकारातील जाणकार माधवराव कानवडे बँकेचे ज्येष्ठ संचालक माजी मंत्री माजी आमदार अण्णासाहेब म्हस्के, बँकेचे संचालक गणपतराव सांगळे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री वर्पे, राहाता तालुका विकास अधिकारी श्री गुळवे यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी विकास सोसायट्याचे चेअरमन, हॉईस चेअरमन, सचिव व तालुक्यातील बँक शाखांचे सर्व शाखाधिकारी यांची वसुलीत संदर्भात कार्यशाळा झाली त्यावेळी श्री शेळके बोलत होते. ज्या शेतकरी सभासदांना इतर कोणत्याही बँकेचे कर्ज घेतलेले नाही. सेवा सोसायटीचे सभासद आहे अशा पात्र सभासदांना 3 एचपी ते १० एचपी पर्यंतचे सौर कृषीपंपासाठी कर्ज पुरवठा करण्याचे धोरण बँकेने घेतलेले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व सभासदांनी आपल्या पीक कर्जाचा वेळेत म्हणजेच दि.31 मार्च 2022 पर्यंत परतफेड करावी. शासनाच्या ३ लाखापर्यंत शून्य टक्के व बँकेचे अतिरिक्त २ लाखापर्यंत शून्य टक्के असा एकूण ५ लाखापर्यंत शून्य टक्के व्याजदर सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
या सर्व योजनेचा लाभ शेतकरी सभासदांना मिळवून देण्यासाठी बँकेचे अधिकारी, विकास सोसायटीचे चेअरमन, लोकप्रतिनिधी व सेक्रेटरी यांनी संगनमताने नियोजनपूर्वक वसुली चे कामकाज करावे अशी सूचनाही यावेळी करण्यात आली.



