संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पुणे – पूर्वी प्रकल्पांचे उद्घाटन कधी व्हायचे हे आठवतही नाही, असा विरोधकांना टोल मारत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, म्हणूनच प्रकल्प वेळेत पूर्ण होणे गरजेचे. शनिवारी (दि.६) पंतप्रधान श्री मोदी पुणे दौऱ्यात एमआयटी येथील सभेत ते प्रारंभी मराठी बोलत होते.
दरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे यांच्या कार्यकर्तृत्वाने पावन झालेल्या पुणेकरांना माझा नमस्कार’ असेही श्री मोदी यांनी म्हटले. पुढे बोलताना श्री म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकार सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेकडे गांभीर्याने लक्ष देत आहे.देशभरात ठिकठिकाणी मेट्रो प्रकल्प उभारले जात आहेत. महाराष्ट्रातही मुंबई, पुणे, नागपुर या भागात मेट्रोचे नेटवर्क उभारले जात आहे. सर्व पुणेकरांना विशेषत: ज्येष्ठांना माझे आवाहन आहे की, त्यांनी जास्तीत जास्त मेट्रो सुविधेचा वापर करावा. देशातील शहरांमध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रिक बस, इलेक्ट्रिक कार व इलेक्ट्रिक वाहने असतील, हा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे प्रदुषण मोठ्या प्रमाणात कमी होऊन पर्यावरणाचे संवर्धन होणार आहे.प्रत्येक शहरात एलईडी बल्ब असावेत, तेथील नदी स्वच्छ असाव्यात, तेथे बायोगॅस प्लांट असावा, हरीत उर्जेचा वापर अधिकाधिक व्हावा, हा आमचा प्रयत्न आहे.
महाराष्ट्राची भुमी ही संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांही ही भूमी आहे.
दरम्यान, श्री मोदी यांच्या हस्ते गरवारे स्थानकातून पिंपरी ते फुगेवाडी मेट्रो मार्ग प्रकल्पाचे उद्घाटन झाले. यावेळी मोदी यांनी स्वत: मेट्रो मार्ग, त्यावरील स्थानके याची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली. नंतर मोदी यांनी मेट्रोचे तिकिट काढून मेट्रोनी प्रवासदेखील केला. प्रवासादरम्यान मोदींनी विद्यार्थी व काही प्रवाशांशीही संवाद साधला. मोदी यांच्यासोबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारदेखील उपस्थित आहेत.
तत्पुर्वी पुणे महापालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, या दौऱ्यात ते अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणीही करणार आहेत. याशिवाय ते आरके लक्ष्मण आर्ट गॅलरी-संग्रहालयाचे उद्घाटन करतील आणि सिम्बायोसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी समारंभातही सहभागी होतील.




