निपाणी जळगावच्या उपसरपंचपदी सुभाष चौधर


संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी-
तालुक्यातील निपाणी जळगावच्या उपसरपंचपदी सुभाष म्हातारदेव चौधर यांची बिनविरोध निवड झाली आहे. माजी उपसरपंच बंडुशेट पठाडे यांचा एक वर्षाचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. या रिक्त जागेवर चौधर यांची निवड झाली आहे.


ग्रा.प.निपाणी जळगाव उपसरपंच पदासाठी सुभाष म्हातारदेव चौधर यांचा एकमेव अर्ज आला होता. निवडणूक अधिकारी तथा ग्रामसेवक यांनी श्री चौधरी यांची बिनविरोध निवड जाहीर केली.


निपाणी जळगावच्या उपसरपंचपदी सुभाष चौधर यांची निवड झाल्याबद्दल सरपंच नितिन गर्जे, बंडुशेट पठाडे, बबन नाकाडे, पाडुरंग थोरे, वसंतराव बोर्डे, संभाजी खेडकर, बाळासाहेब चौधर, शिवाजी नाकाडे सर, जगदिश रक्ताटे, लहानू मोरे, पिंटु चौधर, राहुल चौधर, आस्तान चव्हाण, सागर बोर्डे, मुरली आव्हाड, रमेश आंधारे , सचिन खेडकर, ग्रामसेवक शंकर पातकळ, सेवक दिपक मोरे, रवि गिते आदिंसह ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!