राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर – राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरणाच्या माध्यमातून शहरातील पाच वर्षापर्यंतच्या प्रत्येक बालकाचे घरोघरी जाऊन १०० टक्के लसीकरण करण्यासाठी मनपाने उपाययोजना केल्या आहेत भावी पिढी सुदृढ व निरोगी राहण्यासाठी बालकांच्या आरोग्य कडे लक्ष देणे गरजेचे आहे. बालके हेच देशाचे भावी नेतृत्व आहेत त्यांच्या माध्यमातून भारत देश हा महासत्तेकडे वाटचाल करणार आहे. नगर शहर पोलीओ मुक्त करण्यासाठी लसीकरणाची खरी गरज आहे. बुरुडगाव मनपा प्रभाग कार्यालय परिसरामध्ये मनपाचे भव्य सुसज्ज हॉस्पिटलची निर्मिती होणार आहे नगरकरांना आरोग्याच्या सर्व सुविधा एकाच छताखाली निर्माण होणार आहे आमदार संग्राम जगताप यांच्या मुळे शहरात मनपाच्या मालकीचे हॉस्पिटल उभे राहात आहे असे प्रतिपादन उपमहापौर गणेश भोसले यांनी केले.
बुरुडगाव आरोग्य केंद्र येथे बालकांना पल्स पोलिओ लसीकरणाचा ढोस देऊन शुभारंभ करताना उपमहापौर गणेश भोसले, महिला बालकल्याण समितीच्या उपसभापती मीनाताई चोपडा,मा.नगरसेवक संजय चोपडा, आरोग्य अधिकारी सतीश राजूरकर आदीसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


