संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर : नुकत्याच अनंत बहुउद्देशीय सेवा संस्थांच्या वतीने घेण्यात आलेले सरकार चषक भव्य व्हॉलीबॉल स्पर्धा २०२२ ही स्पर्धा अहमदनगर शहरातील लालमाती सहकार क्रिडा मैदान, पाचपीर चावडी व अलआमीन मैदान (मुकुंदनगर ) येथे पार पडली. या स्पर्धेतील रस्सीखेचीच्या लढाईत प्रथम क्रमांकाचे प्रथम बेस्ट पारितोषिक ११ हजार १११ रुपयांचे सहकार टिमने पटकावले. यावेळी सहकार टिमचे कॅप्टन पोकाॅ राजेंद्र सुद्रिक पा. यांनी आयोजकांच्या हस्ते स्विकारले.
दुसरे पारितोषिक सरकार टिमने तर तिसरे पारितोषक आदर्श भिंगार टिमने पटकावले आहे. अहमदनगर जिल्ह्यासह शहरातून सहकार टीमचे कॅप्टन राजेंद्र सुद्रिक यांच्यासह सर्व सहकार टीम खेळाडूंचे अभिनंदन केले जात आहे.
या स्पर्धात १६ संघांनी सहभाग नोंदविला होता. विजेते संघाला प्रथम पारितोषिक रुपये ११ हजार १११ रुपयांचे पाचपीर चावडी सरकार ड्रायक्लिनर चे कासम भाई केबलवाले यांचे सौजन्याने, द्वितीय पारितोषिक ८ हजार ८८८ रुपये जे.के. कन्स्ट्रक्शन चे शादाब खान यांचे सौजन्याने, तृतिय पारितोषिक ५ हजार ५५५ रुपये वसीम शेख सुपारी वाला यांचे सौजन्याने आणि चौथे पारितोषिक ३ हजार ३३३ रुपये योगेश ठुबे यांचे सौजन्याने जाहीर करण्यात आले होते.





