हिंगोलीच्या वैभव बांगरचे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
हिंगोली – 
येथील वैभव सुभाष बांगर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश मिळविले आहे. त्यांचा निकाल शुक्रवारी जाहीर झाल्यानंतर बांगर कुटुंबियांवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी त्यांनी हे यश मिळविले आहे. हिंगोली जिल्हयातील सर्वात लहान वयाचा अधिकारी होण्याचा मान त्यांनी मिळविला. या परिक्षेत त्यांना ४४२ वी रँक मिळाली आहे.
हिंगोली येथील विद्यानिकेतन इंग्लीश स्कुलमध्ये इयत्ता आठवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी थेट पुणे गाठले. पुणे येथे बी. के. बिर्ला कॉलेजमध्ये इयत्ता बारावीचे शिक्षण पुर्ण केले. मात्र यावेळी अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या वैभव यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून बी.ए. अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. बी. ए. चे शिक्षण घेत असताना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी सुरु केली आणि चार वर्षाच्या खडतर प्रयत्नानंतर हे यश त्यांनी मिळविले आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने आज परिक्षेचा निकाल जाहिर केला असून वैभव यांनी परिक्षेत यश मिळविल्याचे समजताच हिंगोलीकरांनी जल्लोष केला. हिंगोली जिल्ह्यात अवघ्या २२ व्या वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण करण्याचा मान त्यांनी मिळविला आहे.
ध्येय निश्चित करून तयारी केली- वैभव सुभाष बांगर
पुणे येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अधिकारी होण्याचे निश्चित केले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी कला शाखा निवडली. त्यामुळे बी.ए. सोबतच लोकसेवा आयोगाच्या परिक्षेचा अभ्यासही सुरु केला. दररोज बारा तास अभ्यास व स्वतः नोटस तयार करून त्याचे वाचन सुरु केले. लोकसेवा आयोगाच्या परिक्षेसाठी राज्यशास्त्र आणि अंतरराष्ट्रीय संबंध हे विषय घेतले. घरी आई, वडिल व कुटुंबियांनी पाठबळ दिले अन हे यश मिळाले आहे. तरुणांनी ध्येय निश्चित करून त्यानुसार वाटचाल केल्यास कुठलीही गोष्ट कठीण नाही. या गुणांवर आयपीएस होऊ शकेल मात्र आयएएस साठी तयारी करणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!