दि.७ ऑक्टोबरपासून देवाची दारे उघडणार

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई-
राज्यातील मंदिरे आणि प्रार्थनास्थळे येत्या ७ ऑक्टोबरपासून उघडली जाणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीड वर्षापासून राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे बंद होती. दरम्यान, घटनस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील सर्व मंदिरे आणि प्रार्थनास्थळे उघडली जाणार आहेत. मंदिरे कधी उघडणार असा सवाल सातत्याने विचारला जात होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन आठवड्यांपूर्वी राज्यात टप्प्याटप्प्याने मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडली जाणार आहेत. मात्र, भाविकांना कोरोना विषयक नियम पाळावे लागणार आहेत.
मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये, असे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्य सरकारने लवकरात लवकर मंदिरे आणि प्रार्थनास्थळे उघाडावीत यासाठी भाजप, मनसे तसेच विविध संघटनांनी आंदोलने केली होती. भाजपने राज्यभरात घंटानाद केला होता. तसेच, काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील दहा दिवसांत जर मंदिरे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला नाहीतर मोठे जेल भरो आंदोलन करा. मी तुमच्या बरोबर राहील, असा इशारा राज्य सरकारला दिला होता. याशिवाय, राज्यपाल भगत सिंह यांनी देखील मुख्यमंत्र्यांना राज्यात बार, रेस्टॉरंट सुरू झाली आहेत. मग प्रार्थना स्थळे बंद का? मंदिरे बंद ठेवण्याचे दैवी संकेत आपणास मिळत आहेत का? की तुम्ही अचानक सेक्युलर झाला आहात? असा सवाल राज्यपालांनी केला होता. राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले होते. मात्र, त्यावेळी सरकारने मंदिरांबाबत कोणताही निर्णय घेतला नव्हता. दरम्यान, शुक्रवारी राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!