ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर- गेल्या चार वर्षापासून प्रलंबित मागण्यांसाठी नोंदणी व मुद्रांक विभागाचे अधिकारी व कर्मचारी आज मंगळवार (दि.२१) पासून संपावर आहेत. दरम्यान संपामुळे नगर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील मुद्रांक शुल्क विभागाच्या कार्यालयातील दस्त नोंदणी ठप्प आहे.
सर्व संवर्गातील रखडलेल्या पदोन्नत्या तातडीने कराव्यात, पदोन्नतीची कारवाई पूर्ण झाल्याशिवाय नवीन सेवा प्रवेश नियम लागू करू नये, रिक्त पदे तातडीने भरावीत, तरुणांमुळे मृत्यू झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना पन्नास लाखांची तातडीची मदत द्यावी, अनुकंपा तत्वावर नोकरी समावेश करून घ्यावा, बंदी रेरा कायद्यानुसार नोंदणी विभागातील अधिकारी व कर्मचारी या वरील कारवाई मागे घ्यावी या मागण्यांसाठी नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संप सुरु केला आहे, अशी माहिती माहिती नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल जगधने व अनिल जगधने यांच्यासह सुनील जोशी व दिलीप गायकवाड यांनी दिली आहे.
.



