प्रकाश वाईन्स शाॅप व्यवस्थापकाला लुटमार करणारे आरोपी पकडण्यात ‘एलसीबी पथका’ला यश

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन  नेटवर्क
अहमदनगर-
शहरातील झोपडी कॅन्टीन येथील प्रकाश वाईन्स या दुकान व्यवस्थापकाच्या डोळ्यामध्ये मिरची पावडर टाकून रोख रकमेची लुटमार करणारे आरोपी पकडण्यात  स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.
लखन नामदेव वैरागर ( वय २९, रा. सेंटमेरी चर्च पाठीमागे, नागापूर, अहमदनगर ), प्रमोद बालू वाघमारे ( वय २३, रा. आण्णाभाऊ साठे समाज मंदीर शेजारी, नागापूर, अहमदनगर), विशाल भाऊसाहेब वैरागर (वय २५, रा. रस्तापूर, ता. नेवासा),  दिपक राजू वाघमारे ( वय २०, रा. सेंट मेरी चर्च पाठीमागे, नागापूर, अहमदनगर) यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर शहर उपविभाग पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांच्या  मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोनि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार सपोनि सोमनाथ दिवटे, पोहेकॉ संदीप घोडके, संदीप पवार, दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, पोना रवि सोनटक्के, शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, लक्ष्मण खोकले, संदीप चव्हाण, भरत बुधवंत, पोकाॅ योगेश सातपूते, सागर ससाणे, कमलेश पाथरुट आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

याबाबत समजलेले माहिती अशी की , दि १२ स सप्टेंबर २०२१ रोजी प्रकाश वाईन्स, झोपडी कॅन्टीन, अहमदनगर या दुकानाचे व्यवस्थापक आशीर बशीर शेख  (रा. पंचवटीनगर, भिस्तबाग, सावेडी, अहमदनगर) हे रात्री १० वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करुन दिवसभर वाईन शॉपमध्ये जमा झालेली रक्कम बॅगमध्ये ठेवून बॅग मोटार सायकलचे टाकीवर ठेवून घरी निघाले होते. यावेळी  सारस्वत बँकेजवळ पाठीमागून काळ्या रंगाचे, विना नंबरचे पल्सर मोटार सायकलवरुन आलेल्या दोन अनोळखी इसमापैकी मोटार सायकलवर पाठीमागे बसलेल्या इसमाने त्यांच्या डोळ्यावर मिरची पावडर फेकली. त्यावेळी त्यांनी रस्त्याचे कडेला त्यांची मोटारसायकल उभी केली असता, इसमाने त्यांची मोटारसायकलजवळ येवून पुन्हा त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्यांच्या  मोटारसायकलचे पेट्रोल टाकीवर ठेवलेली १० लाख  ७० हजार  रु. रोख रक्कम असलेली बॅग बळजबरीने चोरुन नेली, या व्यवस्थापक आशीर बशीर शेख यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुरनं. ८०६/२०२१ भादवि कलम ३९४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा घडल्यानंतर जिल्हा  पोलीस अधीक्षक मनोज पाटील,  अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर  शहर उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचेपो नि अनिल कटके  यांनी तात्काळ गुन्हा घडले ठिकाणी भेट देवून गुन्हा घडले ठिकाणचे निरीक्षण करुन फिर्यादी यांचेकडून गुन्ह्यातील आरोपीबाबत माहिती घेतली होती. त्यानंतर जिल्हा  पोलीस अधीक्षक श्री पाटील यांच्या आदेशाने पोनि अनिल कटके यांनी गुन्ह्याच्या तपासकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करुन त्यांना सुचना देवून आरोपींचा शोधार्थ रवाना केले. त्यानुसार एलसीबी पथकांनी  गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेत असताना पोनि अनिल कटके यांना गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हा प्रकाश वाईन्स या दुकानामध्ये काम करणारा कामगार लखन वैरागर, (रा. नागापूर, अहमदनगर) याने व त्याचे साथीदारांनी मिळून केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या माहितीचे आधारे आरोपीचे ठावठिकाणाबाबत गोपनिय माहिती घेवून व आरोपीचा शोध घेवून वेगवेगळ्या ठिकाणाहून आरोपींना ताब्यात घेतले. तसेच उर्वरित दोन साथीदारांचा पोलिसांनी शोध घेतला परंतु ते मिळून आले नाहीत. 
ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे गुन्ह्यातील चोरलेल्या रोख रकमेबाबत विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे वाटणीस आलेली ५ लाख २० हजार रु. रोख रक्कम तसेच गुन्ह्याचे वेळी वापरलेल्या ३ लाख ४० हजार  रु. किं. घ्या तीन मोटार सायकल व ४२ हजार ५०० रु. किं. चे चार मोबाईल काढून दिल्याने एकूण ९ लाख २ हजार ५००रु. किं. चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. पकडण्यात आलेल्या  आरोपींना मुद्देमालासह तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील कार्यवाही तोफखाना पोलीस करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!