चार अतिरेकी पकडण्यात विशेष पोलिस पथकाला यश ; सणासुदीत बॉम्बस्फोट घडवण्याचा होता मोठा कट

👉महाराष्ट्रात राहणाऱ्या अतिरेक्याला रेल्वेत केली अटक, भारतातून मस्कतमार्गे जाऊन पाकिस्तानात घेतले प्रशिक्षण
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
नवीदिल्ली-
येणा-या सणासुदीच्या कालावधीत  भारतातील  शहरांत मोठे बॉम्बस्फोट करण्याचा अतिरेक्यांचा कट होता. परंतु तत्पूर्वी दिल्ली पोलिसांनी हा अतिरेक्यांचा कट उधळून लावला आहे. अटक केलेल्या सहा अतिरेक्यांपैकी एक महाराष्ट्र, दोन दिल्ली आणि अन्य चार अतिरेकी हे राजस्थान, उत्तरप्रदेश या ठिकाणावर  पकडण्यात यश आले आहे, अशी माहिती विशेष पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

या कारवाईत महाराष्ट्रात अतिरेक्याला कोटा या ठिकाणी रेल्वेमध्ये पकडण्यात आले. याबाबत  पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पकडण्यात अटक आलेल्या अतिरेक्यांपैकी दोन अतिरेक्यांनी  पाकिस्तानामध्ये शस्त्रास्त्रे चालविण्याचे व विस्फोटक बनविण्याचे प्रशिक्षण घेतले होते. ही मोठी कामगिरी ही मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार विशेष पोलिस पथकाने केली.
पाकिस्तानी हे अतिरेक्यांच्या समुह दिल्ली यासह अन्य ठिकाणी मोठे बाॅम्बस्फोट घडवण्याच्या तयारीत असून, अतिरेकी यांनी गर्दी असणारी ठिकाणे लक्षकेंद्रीत केली  असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या गोपनीय माहितीनुसार   विशेष शाखेचे डीसीपी प्रमोद कुमार कुशवाहा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलिस पथकाने अधिक चाणक्षाने तपास करीत ६ अतिरेक्यांना पकडण्यात आले असून त्याच्याकडून शस्त्रांसह विस्फोटके जप्त करण्यात आली आहेत.
दहशतवादविरोधी कामगिरीचे हे मोठे यश मानले जाते आहे. समीर, लाला, जिशान कमर, ओसामा, जान मोहम्मद अली शेख आणि मोहम्मद अबू बकर अशी अतिरेक्यांची नावं आहेत.
दिल्ली पोलिसांनी  प्रथम महाराष्ट्रात राहणारा समीर नावाचा अतिरेकी पकडला. कोटा येथे रेल्वेमध्ये त्याला पकडण्यात आले. यानंतर दोघांना दिल्लीतून अटक केली गेली. त्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे उत्तर प्रदेशातून तीन व्यक्तींना अटक केली. यातील दोन अतिरेकी एप्रिल महिन्यात मस्कतला गेलेले होते. तेथून जहाजातून त्यांना पाकिस्तानात नेण्यात आले. एका निर्जनस्थळी त्यांना स्फोटकं बनवण्यासोबतच शस्त्रास्त्र हाताळण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं. हे दोघंही सुमारे १५ दिवस पाकिस्तानात होते. प्रशिक्षणानंतर मस्कत आणि तिथून ते भारतात परतले. मस्कतमधून जाताना या दोघांच्या ग्रुपमध्ये बांग्ला बोलणारे साधारण १४ ते १५ व्यक्तीदेखील होते. त्यांनाही पाकिस्तानात दहशतवादाचं प्रशिक्षण दिलं गेलं आणि हेच व्यक्ती परत आल्यानंतर स्लीपर सेल म्हणून काम करत असल्याची शक्यता वर्तवली जातेय.
दहशतवाद्यांना भारत-पाक सीमेच्या अत्यंत नजीकच्या भागातून हाताळण्यात आल्याचीही बाब पुढे आलीय. प्रशिक्षण देण्यात आलेल्यांपैकी एका पथकाचं नियंत्रण अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिम याच्याकडे होतं. सीमेपलिकडून मिळणारी शस्त्रं भारतातल्या वेगवेगळ्या शहरांत लपवण्याचं काम या टीमकडे होतं. महाराष्ट्रातला समीर आणि उत्तर प्रदेशातला लाला नावाचा व्यक्ती या ग्रुपचे सदस्य आहेत.
पोलिसांच्या विशेष शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी सणासुदीच्या दिवसांत बॉम्बस्फोट करण्यासाठी दुसऱ्या ग्रुपकडे भारतातील प्रमुख शहरांमधील महत्त्वाची ठिकाणं निश्चित करण्याची जबाबदारी होती.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!