पालावरच्या वंचित व दुर्लक्षित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे गरजेचे : ॲड.संतोष गायकवाड

शैक्षणिक साहित्य वितरित करून वाढदिवस साजरा
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर –
मानवाधिकार अभियानाचे  प्रदेशाध्यक्ष व सामाजिक चळवळींमध्ये अग्रेसर असणारे ॲड.संतोष गायकवाड यांचा आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानमित्त पालावरच्या वंचित व दुर्लक्षित समाजातील बालकांना शैक्षणिक साहित्य मानवाधिकार अभियान, पीस फाऊंडेशन, ऊर्जीता सोशल फाउंडेशन, रमा फाऊंडेशन यांच्या माध्यमातून वितरित करण्यात आले.  यावेळी सत्कारमूर्ती मानवाधिकार अभियानाचे  प्रदेशाध्यक्ष ॲड.संतोषजी गायकवाड यांच्यासह संध्या मेढे, सॅम्युअल वाघमारे, दीपक अमृत, युवराज गुंड, बाळासाहेब धिवर, दीपक गायकवाड, शरद दारकुंडे, हर्षल कांबळे, रविंद्र गायकवाड यांच्यासह    मानवाधिकार अभियानाचे कार्यकर्ते व विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहून उपेक्षित व वंचित समूहातील बालकांचा शैक्षणिक पुनर्वसनासाठी घेण्यात आलेल्या या पुढाकारास आपले पाठबळ दिले. पालावरील चिमुकल्यांच्या हस्ते संतोष गायकवाड यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. मुलांनी विविध कलांचे सादरीकरण केले.

ॲड.संतोषजी गायकवाड यांनी एक सामाजिक बांधिलकी जपली हे कौतुकास्पद आहे. याचा आदर्श इतरांनी घेतला पाहिजे असे मत कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
यावेळी ॲड.संतोष गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की,  वाढदिवसावर आपण भरमसाठ खर्च करत असतो. मात्र, ज्याला खरी गरज आहे अशांना या दिवशी मदत केली तर ती खऱ्या अर्थाने सार्थकी लागेल. आगामी काळातही मी दुर्गम भागातील मुलांसाठी मदत करणार असून, त्यांच्या शैक्षणिक विकासासाठी मानवाधिकार अभियानाच्या माध्यमातून कार्यरत राहील. वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च करण्यापेक्षा पालावरच्या वंचित व दुर्लक्षित समाजातील आपल्या समाज बांधवांना मदत केली पाहिजे. सामाजिक कार्यकर्ते युवराज गुंड राबवित असलेला पालावरीची शाळा या उपक्रम कौतुकास्पद असून समाजातील दानशूर व्यक्तींनी त्यांचे हात बळकट करण्यासाठी पुढे आले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!